🌟जिंतूरात जितूर आगारातील बस सेवा बंद मुळे एसटी महामंडळाला आठ लाख रुपयांचा फटका....!


🌟खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांकडून दीडपट भाडे वाढवल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय🌟

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

जिंतूर आज सकाळपासूनच अचानक जिंतुर आगारातील  बसेस बंद झाल्यामुळे  शाळेतील विद्यार्थी व बाहेरगावी आलेले प्रवासी यांना त्रास सहन करावा लागला असून मिळेल त्या खाजगी वाहनाने जावे लागले.

आज मराठा सेवा संघांच्या सर्वत्र बंद मुळे जिंतूर आगारातील एकही बस बाहेर न पडल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागला व जिंतूर आगारांचे त्यात सर्व बस फेऱ्या बंद असल्यामुळे जिंतूर आगारांचे एक दिवसांचे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली.

🌟खाजगी वाहनाने दीडपट भाडे आकारले :-

तरी एकीकडे बस फेऱ्या बंद असल्यामुळे प्रवाशांचे, विद्यार्थ्यांचे हाल झाले असून दुसरीकडे खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांकडून दीडपट भाडे वाढवल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या