🌟मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी संभाजी सेना करणार भव्य रास्ता रोको आंदोलन.....!


🌟परभणी येथील ब्राह्मणगाव फाटा येथे उद्या सोमवार दि.०४ सप्टेंबर रोजी संभाजी सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन🌟

परभणी (दि.०३ सप्टेंबर २०२३) - महाराष्ट्र शासनाने मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी एक लाख रुपये मदत जाहीर करावी या प्रमुख मागणीसाठी संभाजी सेनेच्या वतीने संपूर्ण मराठवाड्यात उद्या सोमवार दि.०४ सप्टेंबर २०२३ रोजी भव्य रास्ता रोको आंदोलनाची घोषणा करण्यात आली.

 संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी परभणी जिल्हा संभाजी सेनेच्या वतीने उद्या सोमवार दि.०४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास परभणीतील ब्राह्मणगाव फाटा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात संभाजी सेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे,ग्रामीण  जिल्हाध्यक्ष सुधाकर सोळंके,शहराध्यक्ष अरुण पवार,जिल्हा संपर्कप्रमुख नारायण देशमुख,युवक जिल्हाध्यक्ष दिगंबर धोंडगे,युवक शहाध्यक्ष सोनू पवार यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या