🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स /बातम्या....!


🌟उज्वला मोफत गॅस योजनेचा विस्तार; केंद्र सरकार 75 लाख महिलांना देणार मोफत गॅस कनेक्शन🌟

* मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार होते, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ व्हायरल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा झाला रद्द.

* फक्त मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलायचे होते, चुकीचा संदेश व्हायरल करत विरोधकांचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ; व्हायरल व्हिडिओ बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण. 

* आम्ही काय पाप केले म्हणून आम्हाला आरक्षण देत नाही, मनोज जरांगे यांची मुलगी पल्लवी मनोज जरांगे पाटील हिने बुलढाण्यात अतिशय विराट व मोठ्या संख्येने निघालेल्या मराठा मोर्चामध्ये सरकारला विचारला सवाल.

* मराठा आरक्षणाच्या मागणीची सरकारने दखल न घेतल्यास आमदार खासदारांच्या घरांवर  मराठा समाज मोर्चा काढणार ; बुलढाण्यात  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघाला मराठा समाजाचा अतिशय विराट मराठा क्रांती मोर्चा.

* शेअर बाजारात तेजी, निफ्टी पहिल्यांदाच 20 हजार अंकांवर बंद; गुंतवणूकदारांनी कमावले 1.57 लाख कोटी.

* संसद कर्मचाऱ्यांसाठी नवे गणवेश तयार, विशेष अधिवेशनात संसद अधिकारी आणि कर्मचारी दिसणार नव्या ड्रेस कोडमध्ये.

* राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आजपासून  3 दिवस पुण्यामध्ये अखिल भारतीय समन्वयची बैठक ; बैठकीत 36 संघटनांचे 266 प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार

* उज्वला मोफत गॅस योजनेचा विस्तार; केंद्र सरकार 75 लाख महिलांना देणार मोफत गॅस कनेक्शन ; केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

* 2011 च्या तुलनेत 2021 मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण 70 टक्यांनी वाढले; NCRB रिपोर्ट.

* नाशिकचे बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांच्या अपहरण प्रकरणाची उकल करण्यात अखेर नाशिक पोलिसांना यश; याप्रकरणी 5 जणांना अटक

* जम्मू-काश्मिरमधील शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तान घुसखोरी करतय- लष्करी अधिकारी

* श्रीलंका-पाकिस्तान सामन्यात कुलदीपने रचला इतिहास, 150 विकेट्स घेणारा ठरला चौथा गोलंदाज.

* आता मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी पेटुन उठला आहे त्यामुळे सरकारला मराठा आरक्षणाच्या प्रश्नांची दखल निश्चितच घ्यावी लागेल मनोज जरांगे पाटील यांची मुलगी पल्लवी मनोज जरांगे पाटील हिचे बुलढाण्यातील मराठा समाजाच्या अतिशय विराट व भव्य दिव्य मोर्चामध्ये प्रतिपादन.  

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या