🌟राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात सहभागी व्हा - अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे


🌟यासाठी २० ऑगस्ट ते ०२ ऑक्टोबर यादरम्यान प्रशासन स्तरावर ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान🌟

परभणी (दि.०४ सप्टेंबर २०२३) : जिल्ह्यात प्रशासन लोकाभिमुख करणे, त्यात निर्णयक्षमता आणणे आणि सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वीत करणे यासाठी २० ऑगस्ट ते ०२ ऑक्टोबर यादरम्यान प्रशासन स्तरावर ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान’ राबविण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनातील सर्व विभागांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी केले आहे.

शासनाच्या कार्यपद्धतीमध्ये कालानुरूप अपेक्षित असलेले बदल तसेच नव्याने अस्तित्वात आलेले शासकीय कामकाजासंबंधीच्या अधिनियमातील तरतुदी विचारात घेता, प्रशासकीय कामकाजामध्ये लोकाभिमुख व लोककेंद्रीत असलेली गतिमानता अपेक्षित आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या या योजनेचे पुनर्विलोकन करू सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ आणि लोकाभिमुखता या दोन मुख्य बाबींच्या आधारे अभियानाचे कार्यक्षेत्र व कार्यपद्धती नव्याने निश्चित करायची आहे. त्यानुसार ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान’ राबविण्यासाठी नवीन कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

बदलत्या नवीन तंत्रज्ञानामुळे व जागतिकीकरणामुळे प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करणे गरजेचे आहे. त्यानुसार प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता व निर्णयशीलता आणण्याकरिता तसेच सर्वाच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान’ या योजनेचे निकष व कार्यपद्धती नव्याने निश्चित करून अभियान राबविणे व अभियानांतर्गत स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. त्यामुळे या स्पर्धेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे डॉ. काळे यांनी सांगितले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या