🌟राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मा.उपसभापती जानिमियॉ कुरेशी यांची सिरसाळा येथील मराठा आरक्षण आंदोलनास भेट...!


🌟मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी घटनेचा केला निषेध🌟 

परळी वैजन (प्रतिनिधी) :- सिरसाळा येथे सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनस्थळी जालना येथील अंतरवेली सराटी गावात पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सिरसाळा येथील मोहा रोडवरील शिवपार्क येथे ठिय्या आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते तथा पंचायत समितिचे माजी उपसभापती जानिमियॉ कुरेशी यांनी भेट देवुन मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी भूमिका त्यांनी मांडली आणि मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला तसेच जालन्यात झालेल्या घटनेचा निषेध दर्शवला आणि या घटनेची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी केली.यावेळी  अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या