🌟पुर्णा तालुक्यातील माखणीतीलल 5 तरुणांचे मराठा आरक्षणासह अंतरवली घटनेच्या निषेधार्थ आमरण उपोषण...!


🌟सचिन आवरगंड,गणेश सोळंके,गोविंद आवरगंड,विष्णू आवरगंड आणि कृष्णा आवरगंड अशी या तरुणांची नाव आहेत🌟

परभणी/पुर्णा :- आंतरवली सराटी नंतर राज्यात या गावात सुरू झाले दुसरे आमरण उपोषण,मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत,तोपर्यंत आमरण उपोषणावर ठाम राहण्याचा पुर्णा तालुक्यातील माखणी गावच्या 5 तरुणांनी निर्धार केला असून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.


जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी या गावात मनोज जरांगे यांनी आठ दिवसापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे,येथील उपोषण कर्त्यांवर लाठीमार केल्यानंतर राज्यभर सरकारचा निषेध सुरू झाला असून आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील दुसऱ्या ठिकाणी ही आमरण उपोषण सुरु होऊ लागलीयेत. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील माखणी येथील 5 तरुणांनी आमरण उपोषणाला आजपासून सुरुवात केलीय, मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून हे उपोषण करण्यात येत असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा ईशारा या तरुणांनी सरकारला दिलाय,  माखणी येथील सचिन आवरगंड,गणेश सोळंके,गोविंद आवरगंड,विष्णू आवरगंड आणि कृष्णा आवरगंड अशी या तरुणांची नाव आहेत......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या