🌟परभणी जिल्ह्यातील उर्वरित 41 मंडळाना सोयाबीनचा 25% अग्रीम विमा मिळणार....!


🌟अशी अधिसुचना जिल्हाधिकारी तथा पंतप्रधान पिक विमा योजना समितीचे अध्यक्ष रघुनाथ गावडे यांनी काढले🌟

🌟साधारणतः 2, 69,000 हेक्टर विमासंरक्षित सोयाबीन क्षेत्राला प्रति हेक्टर 7500 प्रमाणे एकूण 2010 ते 2020 कोटी मिळणार🌟                                    

परभणी (दि.08 सप्टेंबर 2023) -  परभणी जिल्ह्यातील उर्वरित 81 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन साठी 25% अग्रीम पिक विमा संबंधित कंपनीने वितरित करावा असे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शुक्रवारी सकाळी दिले आहेत.

या जिल्ह्यात यापूर्वी पावसाच्या खंडामुळे 11 महसूल मंडळातील 81000 हेक्टर सोयाबिन विमा संरक्षीत क्षेत्रातील प्रतिहेक्टर साधारणतः 9000 प्रमाणे 73 कोटी रुपये देण्याची अधिसूचना निघालेलीच होती.त्या पाठोपाठ उर्वरित महसूल मंडळातील सोयाबीन या पिका संदर्भात सकारात्मक असा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे जिल्ह्यातील  सोयाबीन (350000 हेक्टर) विमा संरक्षित असणारा एकही शेतकरी 25% अग्रीम पासून वंचित राहणार नाही असे चित्र आहे जमिनीतील आद्रता, वातावरणातील उष्णता, त्या उष्णतेमुळे होणारे बाष्पाचे प्रमाण, पिकाच्या वाढीतील फरक ,पावसाच्या बदलाचे प्रमाण आधी ट्रिगरचा  संयुक्त सर्वेक्षण करण्यासाठी पहिल्यांदाच वापर झाल आहे.                                                

जिल्ह्यातील भाजप लोकसभा संयोजक डॉ. सुभाष कदम,हेमचंद्र शिंदे विशंभर गोरवे आणि टीमने तांत्रिक बाबीसह शेतकऱ्यांना बरोबर घेऊन केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी आग्रिम मिळण्यासाठी वेळोवेळी मोर्चा आंदोलनासह निवेदन दिले होते या दुष्काळसद्रश परिस्थितीत कापूस व तुर  संयुक्त सर्वेक्षण झाले नसल्याने कापूस तूर विमासंरक्षककवच धारक शेतकरी मात्र 25% आग्रीम पासून वंचित राहतील अशी खंत डॉ. सुभाष कदम यांनी बोलून दाखवली होती.या दोन पिकाचही संयुक्त संरक्षण करण्याची मागणी त्यांनी केली.

पावसाच्या खंडामुळे यापूर्वीच अधिसूचना निघालेले जिल्ह्यातील महसूल मंडळ                           

* परभणी तालुका :1 परभणी 2 दैठणा.

* पालम तालुका :- 1 रावराजुर 2 पेठशिवनी‌ 

 * पाथरी तालुका :- 1 पाथरी 2 बाबुळगाव

 * पूर्णा तालुका :- 1 लिमला 2 ताडकळस 

* मानवत तालुका :-  1  केकरजवळा

* जिंतूर तालुका :- 1  जिंतूर   

* सेलू तालुका :-1  सेलू या मंडळात विमा मंजूर झाला.   

संयुक्त सर्वेक्षण करण्यासाठी कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ डॉ. डाखोरे, जिल्हा कृषी अधीक्षक लोखंडे , कृषी विभागाचे सांख्यिकी अधिकारी माधव लोंढे, परभणी व पुर्णेचे तालुका कृषी अधिकारी काळे, सोनपेठ व मानवत चे तालुका कृषी अधिकारी  कोरेवाड, पाथरी व जिंतूरचे तालुका कृषी अधिकारी श्री कच्छवे, सेलूचे तालुका कृषी अधिकारी श्री पठाण, गंगाखेडचे तालुका कृषी अधिकारी श्री बनसोडे तर पालमचे तालुका कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख यांनी सहा दिवस अहोरात्र मेहनत घेतली.या संयुक्त सर्वेक्षण टीम मध्ये महसूल, व जिल्हा पंचायतचे अधिकारी कर्मचारी तथा आयसीसीआय लोम्बार्ड चे प्रतिनिधी सुद्धा सर्व मंडळात सर्वेक्षण करण्यात सहभागी होते.

गाव पातळीवर डॉ. सुभाष कदम,श्री हेमचंद्र शिंदे,माजी जिल्हा परिषद सदस्य रामकिशनराव रौंदळे,श्री गोविंद उर्फ बंटी लांडगे,  श्री.विशंभर गोरवे, यांच्यासह  पिकविमा चळवळीत काम करणारे श्री शिवाजीराव मोहाळे, बाळासाहेब भालेराव, श्री सुभाष आंबट, डॉ उमेश देशमुख, भोगावचे कृष्णा देशमुख, श्री अनंता पारवे ,लहु शेळके, श्री बालाजी कच्छवे, श्री माधव अण्णा चव्हाण,  श्री कृष्णाजी सूर्यवंशी, बामणी महसूल मंडळात श्री भास्कर ठोंबरे, जिंतूर तालुका, नागोरावाव कदम, श्री सर्जेराव कदम, श्री शिंदे, श्री सूर्यवंशी,  राणीसावरगाव मंडळात श्री इमडे व श्री मोठे, श्री माणिकप्पा कोरे, श्री राजेभाऊ निळे वडगाव मंडळ, श्री युवराज बचाटे, श्री पप्पू उर्फ पांडुरंग नखाते. जिंतूर तालुक्याचे गोपाल राऊत. सेलू तालुक्याचे जयसिंग शेळके, पूर्णा तालुक्यात श्री आनंद बनसोडे श्री चापके दादाराव श्री प्रसाद चापके, श्री जोगदंड,श्री बाळासाहेब कदम श्री बळीराम कदम श्री ठाकूर श्री दाजीबा भोसले,श्री राम भाऊ चापके, श्री पंकज लोखंडे,पेडगाव मंडळात श्री गणेश देशमुख श्री दत्तराव साबळे श्री मधुकर घुले, श्री योगेश खरवडे,कोल्हा मंडळात श्री सुभाष जाधव श्री हरिभाऊ निर्वळ श्री गजानन जाधव,हादगाव मंडळाची थोरे बाबजी ,आवलगाव मंडळात श्री परमेश्वर यादव श्री ओंकार यादव शेळगाव मंडळात श्री राजाभाऊ कदम .श्री रोडे शिवराम आवलगाव मंडळात श्री सुशील रेवडकर गंगाखेड मंडळात श्री आप्पासाहेब भोसले,श्री रामेश्वर आळनुरे, श्री यशवंत काळे, श्री शिवाजी शिंदे श्री बंडू भिसे

पिंपळदळी मंडळात श्री शंभू देव मुंडे श्री सुप्याचे श्री खाकरे आप्पा व श्री घोगरे,पिंपळदरी मंडळाचे केशव मुंडे श्रीकृष्णा मुंडे।     बनवस मंडळात श्री गोविंद लांडगे आप्पा, बलोरे आप्पा, श्री एम के  मल्लिकार्जुन लांडगे, सीएम पाटील, महादेवाडीचेे सरपंच, महातपुरी मंडळात श्री भास्कर जाधव श्री नारायण श्री अंगद भिसे श्री ईश्वर पवार श्री दशरथ कदम श्री माणिक मोरे श्रीविठ्ठल जाधव, श्री नामदेव जाधव श्री घुलेश्वर माऊली,श्री गरड यांच्या पिकविमा चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्ते,शेतकऱ्यांनी सुद्धा या कर्मचाऱ्यांना सहकार्य केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या