🌟'इस्रो'वर शोककळा : चांद्रयान-3 ला काउंटडाऊन देणारा आवाज हरपला....!


🌟शास्त्रज्ञ एन.वलरमथी यांचे निधन झाले आहे : हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला🌟   


                                                                             
चांद्रयान-3 च्या रोव्हर प्रज्ञानने चंद्राच्या पृष्ठभागावर आपले काम पूर्ण केले आहे आणि आता ते स्लीप मोडमध्ये गेले आहे. मात्र या मोहिमेत सहभागी असलेल्या एन. वलरमथी यांचे निधन झाल्याने इस्रोवर शोककळा पसरली आहे.भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञ एन. वलरमथी (N Valarmathi) यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. चांद्रयान 3 रॉकेट प्रक्षेपणाच्यावेळी काउंटडाउन करताना वलरामती यांनी आवाज दिला होता. त्यांच्या निधनानंतर इस्रोमध्ये (ISRO) शोककळा पसरली आहे. वयाच्या 64 व्या वर्षी एन. वलरमथी यांनी अखेरचा श्वास घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, इस्रोचे शास्त्रज्ञ एन. वलरमथी या तामिळनाडूतील अरियालूरचे रहिवासी होत्या. राजधानी चेन्नईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 14 जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-3 लाँच करण्यात आले होते. चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणादरम्यान, एन. वलरमथी यांनी काउंटडाउनसाठी त्यांचा आवाज दिला. इस्रोचे माजी शास्त्रज्ञ डॉ पीव्ही व्यंकटकृष्ण यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या उत्तर ध्रुवावर उतरलेले चांद्रयान 14 जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले होते. यशस्वी चांद्रयान 3 मोहीम त्यांचे अंतिम काउंटडाउन ठरले आहे.

शास्त्रज्ञ एन वलरमथी यांच्या निधनाने इस्रोचं मोठं नुकसान झालं आहे. शनिवारी, 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी चेन्नई येथे त्यांचे निधन झाले. देशाचा पहिला स्वदेशी रडार इमेजिंग उपग्रह असलेल्या RISAT च्या त्या प्रकल्प संचालक होत्या. चांद्रयान-3 मोहिमेत वलरमथी यांचा मोठा वाटा होता. चांद्रयानाने त्याची यशस्वी कामगिरी केल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने एन वलरमथी यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

इस्रोचे माजी शास्त्रज्ञ डॉ पीव्ही व्यंकटकृष्ण यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.  "श्रीहरिकोटा येथून इस्रोच्या भविष्यातील मोहिमांच्या काउंटडाऊनमध्ये वलरमथी मॅडमचा आवाज यापुढे ऐकू येणार नाही. चांद्रयान 3 हे त्याचे अंतिम काउंटडाउन होते. खूप दुखावलो गेले आहे," असे डॉ पीव्ही व्यंकटकृष्ण यांनी म्हटलं आहे.

वलरमथी यांचा जन्म 31 जुलै 1959 रोजी झाला होता. वयाच्या 25 व्या वर्षीच त्या इस्रोमध्ये सामील झाल्या. त्यांनी अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये भाग घेतला होता. वलरमथी यांनी RISAT-1 या पहिल्या* *स्वदेशी-विकसित रडार इमेजिंग उपग्रह (RIS) आणि भारताचा प्रकल्प संचालक म्हणून काम केले होते. 15 ऑगस्ट 2015 रोजी त्यांना प्रतिष्ठित अब्दुल कलाम पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

* चांद्रयान-3 चे प्रज्ञान रोव्हर स्पिल मोडवर :-

चांद्रयान-3 च्या रोव्हर प्रज्ञानने चंद्राच्या पृष्ठभागावर आपले काम पूर्ण केले आहे आणि आता ते स्लीप मोडमध्ये गेले आहे. इस्रोने शनिवारी ही माहिती दिली. यापूर्वी, इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ म्हणाले होते की चंद्रावर पाठवलेले चांद्रयान-3 चे रोव्हर आणि लँडर योग्यरित्या कार्यरत आहेत आणि चंद्रावर रात्र असल्याने ते 'निष्क्रिय' केले जाईल. 

✍️ मोहन चौकेकर

­

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या