🌟केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 29 सप्टेंबर रोजी वाशीम दौऱ्यावर......!


🌟दुपारी 12.15 वाजता आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निवासस्थानी आगमन🌟

फुलचंद भगत

वाशीम:-केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी हे 29 सप्टेंबर रोजी वाशीम येथे येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.शुक्रवारी 29 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून हेलिकॉप्टरने वाशिमकडे प्रयाण. सकाळी 10:30 वाजता वाशिम येथील पोलीस कवायत मैदान येथे आगमन. सकाळी 10:30 वाजता पोलीस कवायत मैदान येथून शासकीय वाहनाने रिसोड मार्गावरील पाटणी कॉम्प्लेक्सकडे प्रयाण. सकाळी 10:40 वाजता पाटणी कॉम्प्लेक्स येथे आगमन. सकाळी 10.45 वाजता श्री.नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 चे राष्ट्रार्पण करण्यात येईल. दुपारी 12 वाजता पाटणी कॉम्प्लेक्स येथून जवाहर कॉलनी येथे दुपारी 12.15 वाजता आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निवासस्थानी आगमन. दुपारी 1 वाजता जवाहर कॉलनी, वाशीम येथून पोलीस कवायत मैदानाकडे शासकीय वाहनाने प्रयाण. दुपारी 1:10 वाजता हेलिपॅड येथे आगमन व दुपारी 1.45 वाजता हेलिकॉप्टरने अकोलाकडे प्रयाण करतील....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या