🌟परभणी जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांच्या आस्थापनेवरील अवर्गीकृत कोतवाल पदभरती परीक्षा आता 24 सप्टेंबरला...!


🌟सर्व पात्र परीक्षार्थींनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे🌟

परभणी (दि.05 सप्टेंबर 2023) : राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाकडून घेण्यात येणारी जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांच्या आस्थापनेवरील अवर्गीकृत कोतवाल संवर्गातील पदे भरण्यासाठीच्या 31 जुलै 2023 रोजीच्या प्रकाशित  जाहिरातीनुसार 10 सप्टेंबर 2023 रोजी कोतवाल पदभरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार होती. 

मात्र तलाठी भरती प्रक्रिया व इतर कामकाजामुळे 10 सप्टेंबर रोजी होणारी कोतवाल संवर्गातील पदभरती परीक्षा आता 24 सप्टेंबर रोजी होणार आहे. याची सर्व पात्र परीक्षार्थींनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे. तसेच कोतवाल संवर्गातील परीक्षेबाबत आवश्यक माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाचे parbhani.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या