🌟परभणी जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 4.7 मिलिमीटर पावसाची नोंद....!


🌟पुर्णा तालुक्यात ११.४ मिलिमीटर पावसाची नोंद🌟

परभणी (दि.०४ सप्टेंबर २०२३) : जिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी केवळ ४.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस पालम तालुक्यात (२४.१ मिमी.) झाला असून, त्याखालोखाल पुर्णा (११.४ मिमी), मानवत (३ मिमी), गंगाखेड तालुक्यात (२.४ मिमी) पावसाने हजेरी लावली. याशिवाय जिल्ह्यात परभणी तालुका (१.९), पाथरी (१.५), जिंतूर तालुक्यात (०.७) पावसाची नोंद झाली. तर सर्वात कमी पाऊस हा जिंतूर (०.१), सेलू तालुका पावसाअभावी कोरडा राहिला आहे. औरंगाबाद विभागाचा विचार करता विभागात पडलेल्या पावसाची सरासरी ही १३ मिमी आहे.  हा सर्व पाऊस मिलीमीटर परिमाणात आहे....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या