🌟परभणी जिल्ह्यात 24 तासात सरासरी 4 मिलिमीटर पावसाची नोंद....!


🌟तर जिंतूर,सेलू,सोनपेठ तालुक्यात पाऊस झाला नाही🌟

परभणी (दि.12 सप्टेंबर 2023) : जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी केवळ 4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस पालम तालुक्यात (30.4 मिमी) झाला असून, त्याखालोखाल परभणी व गंगाखेड  (2.7), पुर्णा (1.7) झाला आहे. याशिवाय मानवत आणि पाथरी तालुक्यात (0.7 मिमी) पावसाने हजेरी लावली. तर जिंतूर, सेलू आणि सोनपेठ तालुक्यात पाऊस झाला नाही. औरंगाबाद विभागाचा विचार करता, गेल्या 24 तासातील विभागात पडलेल्या पावसाची सरासरी ही 2.1 मिमी राहिली आहे.....   


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या