🌟परभणी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाची हजेरी : 24 तासात सरासरी 18.2 मिलिमीटर पावसाची नोंद....!


🌟पुर्णा तालुक्यात ८.१ मिलिमीटर पावसाने लावली हजेरी🌟 

परभणी (दि.०८ सप्टेंबर २०२३) : जिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी १८.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस जिंतूर तालुक्यात (२६ मिमी) झाला असून, त्याखालोखाल गंगाखेड (२४.४), पालम (२२.२), सोनपेठ (२०.३), सेलू (१८.३), परभणी (१५.२) पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय मानवत (१४.४), पाथरी (१३.८) आणि पुर्णा तालुक्यात (८.१) पावसाने हजेरी लावली आहे. औरंगाबाद विभागाचा विचार करता गेल्या २४ तासातील विभागात पडलेल्या पावसाची सरासरी ही १७.९ मिमी राहिली आहे..... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या