🌟पुर्णा शहरातील अनेक भागात गौरी (महालक्ष्मी) गणपती महोत्सव काळातही अंधार....!


 🌟कोट्यवधी रुपयांच्या निधीतून उभारलेल्या खांबावरील पथदिवे बंद : आनंदनगर भागात १५/२० दिवसापासून अंधार🌟 


पुर्णा (दि.२२ सप्टेंबर) - पुर्णा नगर परिषदेतील धृतराष्ट्री कारभाराला पुर्णा शहरातील जनता अक्षरशः वैतागली असून कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आल्यानंतर देखील थोरात सर्वत्र नागरी समस्यांचा डोंगर उभा असल्याचे दिसत आहे पूर्णा शहरातील पथदिव्यांसाठी नगर परिषदेला विविध लोकप्रतिनिधींच्या विकासनिधीतून तसेच शासनाच्या विविध योजनांतून कोट्यावधी रुपयांचा शासकीय निधी प्राप्त झाल्यानंतर देखील शहरातील अनेक भागांमध्ये केवळ खांब उभारण्यात आली असून त्या खांबांवर कुठल्याही प्रकारचे लाईट बसवण्यात आलेले नाहीत अनेक भागांमध्ये काही दिवसापूर्वीच बसवण्यात आलेली लाईट बंद पडलेली असून या भागामध्ये अक्षरशः 'अंधेर नगरी चौपट राज' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

नगर परिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी युवराज पोळ अक्षरशा धृतराष्ट्राची भूमिका निभावत असून पिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवून नागरी समस्यांचे जाणीवपूर्वक डोंगर रचत असल्याचे दिसत आहे अधिकारी पोळ नागरिकांनी दिलेल्या नागरी समस्यांच्या संदर्भातील कुठल्याही तक्रारीचे दखल घेत नसल्यामुळे नागरिक अक्षरशा वैतागले असून मुख्याधिकारी नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करून त्यातील विविध भागात होत असलेल्या बोगस विकास कामांच्या गुत्तेदारांची बोगस बिले काढण्याकडे जास्त लक्ष देत असल्याचे बोलले जात आहे शहरातील मुख्य रस्त्यांसह नागरी वसाहतींमध्ये पथदिवे बसवण्यासाठी सुद्धा कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून नगर परिषद प्रशासनाने केवळ खांब उभी केली असून ही खांब पथदिव्यां अभावी केवळ शोभेच्या वस्तू बलले आहेत.

पुर्णा शहरातील आनंद नगर या उच्चभ्रू वसाहतीत मागील १५/२० दिवसापासून नागरिकांना अंधारी रस्त्यावरच वावरावे लागत आहे याकडे नगर पालिकेने लवकरात लवकर लक्ष देऊन या परिसरातील पथदिवे चालू करण्याची मागणी आनंद नगर येथील नागरिकांनी आज शुक्रवार दि.२२ सप्टेंबर रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी युवराज पोळ यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली असून या निवेदनाची मुख्याधिकारी पोळ खरोखर दखल घेतात की नेहमी प्रमाणे याही निवेदनाला केराची टोपली दाखवतात याकडे पुर्णेकरांचे लक्ष लागले असून या निवेदनावर करण कल्याणकर,रमेश सुर्यवंशी,राज ठाकर, राधेश्याम महामुने, नामदेव खंदारे,योगेश खंदारे, युवराज कदम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत...... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या