🌟परभणी जिल्ह्यातील पालम बसस्थानकासाठी पालम नगर पंचायत नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषणास सुरुवात...!


🌟तहसिल कार्यालया समोर नगराध्यक्षा सौ.मंगलताई सिरसकर यांच्या नेतृत्वखाली आमरण उपोषण : आता निर्णायक लढाई🌟

परभणी (दि.०२ ऑगस्ट २०२३) : पालम शहरातील बसस्थानक उभारणीतील अक्षम्य दिरंगाईच्या निषेधार्थ पालम नगर पंचायतच्या नगराध्यक्षांसह अन्य काही सदस्य व मान्यवरांनी पालम तहसील कार्यालयासमोर बुधवार पासून उपोषण सुरु केले आहे.

             नगराध्यक्षा सौ. मंगलताई वसंतराव सिरसकर, उपनगराध्यक्षा अनवरी बी हितायतउल्लाह खान पठाण यांच्यासह नगरसेवक संजय थिटे, उबेदुल्लाह खान पठाण, मुबीन खुरेशी, सौ. सविताबाई लक्ष्मण रोकडे, सौ. अनिता जालिंदर हत्तीअंबीरे, श्रीमती गौसीया आबुदबीन चाऊस, कैलास रामराव रुद्रवार, समीर खान पठाण, श्रीमती धुरपदाबाई विश्‍वनाथ हिवरे, गोपाळ हत्तीअंबीरे, भास्करराव सिरसकर, श्रीमती रजिया बेगम सय्यद इफ्तेखार, सौ. सरस्वती ज्ञानराज घोरपडे, श्रीमती सरस्वती सदाशिव सिरस्कर, हैदर खाँ पठाण, गजानन पवार, बालासाहेब रोकडे, फेरोज खान पठाण या सदस्यांनी जिल्हाधिकार्‍यांना महसूल यंत्रणेच्या माध्यमातून पाठवलेल्या निवेदनातून वर्षानूवर्षापासून बसस्थानक उभारणीची मागणी रखडल्याबद्दल तीव्र खंत व्यक्त केली. पालम हा जिल्ह्यातील एकमेव तालुका मुख्यालय आहे. ज्या ठिकाणी बसस्थानक नाही. तालुका निर्मिती 1992 साली झाली.  तेव्हापासून आजपर्यंत 30 वर्षांचा कालावधी उलटला परंतु, बसस्थानक उभारल्या गेले नाही. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात तालुका ठिकाणी बसस्थानक नाही, त्यामुळे आम्हा सदस्यांना प्रश्‍न पडतो की, ‘आम्ही दुर्गम, डोंगराळ, आदिवासी भागात तर राहत नाही ना?’ कारण, बसने प्रवास करणारे प्रवाशी बसची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभे असतात. उन्ह, वारा, पाऊस आदींपासून संरक्षणाची कोणतीही सोय परिवहन विभागाने केली नाही.   वर्षानूवर्षापासून मागणी होवूनसुध्दा त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत राहीले. त्यामुळेच नगरपंचायतचे आम्ही सर्वपक्षीय सदस्य उपोषणास बसत आहोत, असे या संतप्त पदाधिकार्‍यांसह सदस्यांनी नमूद केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या