🌟परभणीतील नवा मोंढा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौ.बलसा व खानापूर नगर या भागात दरोडा टाकणारा आरोपी अटक...!


🌟आरोपीस स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने साखला प्लॉट भागात सापळा रचून ताब्यात घेतले🌟

परभणी (दि.२४ आगस्ट २०२३) : परभणी येथील नवा मोंढा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे बलसा व खानापूर नगर या भागात घरफोड्या व दरोडा टाकणारा राहुल विठ्ठलराव भोसले नामक (रा. सुखीपिंप्री ता. पूर्णा) या आरोपीस स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने साखला प्लॉट भागात सापळा रचून ताब्यात घेतले.

          खानापूर नगर भागात घराचे दार उघडून आत प्रवेश करीत चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी नगदी 14 हजार रुपये व अंगावरील दागिणे असा एकूण 68 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. पाठोपाठ मौजे बलसा याही भागात घरफोडी केली. या प्रकरणात नवामोंढा पोलिस ठाण्यात 25 जूलै रोजी गुन्हे दाखल झाले. पोलिस अधिक्षक श्रीमती आर. रागसुधा यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागास तपास सोपवून सूचना दिल्या. 24 ऑगस्ट रोजी गोपनीय माहिती मिळाल्या पाठोपाठ एका पथकाने साखला प्लॉट भागातून भोसले यास ताब्यात घेतले. त्याने दोन्ही गुन्ह्याची कबुली दिली. तीन साथीदारांच्या मदतीने ही घरफोडी केल्याचे त्याने कबुल केले. दरम्यान, आरोपीकडून 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक पी.डी. भारती, पोलिस उपनिरीक्षक जी.ए. वाघमारे, ए.पी. बिराजदार, अंमलदार रवि जाधव, दिलावर खान, शेख रफियोद्दीन, निलेश परसोडे आदींनी या मोहिमेत सहभाग नोंदवला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या