🌟दशनाम गोसावी समाजाच्या स्मशानभूमीच्या रस्त्याची मनपा अतिरिक्त आयुक्त जयंत सोनवणे यांच्या कडून पाहणी...!


🌟प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागणीला यश : दहा दिवसात काम पूर्ण करा अभियंत्यांना दिल्या सूचना🌟

परभणी (दि.१० आगस्ट २०२३) - प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या वतीने दिनांक १० जुलै २०२३ रोजी परभणी शहरातील दशनाम गोसावी समाजाच्या रस्त्याचा प्रश्न मनपाने कायमस्वरूपी मार्गी लावावा व समाजाच्या मृतदेहाची विटंबना टाळावी याबाबत निवेदन अप्पर जिल्हाधिकारी श्री. प्रताप काळे यांना दिले होते. निवेदनाची दखल घेत परभणी शहर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त श्री. जयंत सोनवणे यांनी दिनांक २४ जुलै २०२३ रोजी पत्र काढून या प्रकरणात तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या होत्या या बाबत प्राप्त अहवाला नंतर आज दिनांक रोजी परभणी शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. जयंत सोनवणे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने व शहर प्रमुख अंकुश गिरी यांच्यासह शहरातील धार रोडवरील दशनाम गोसावी समाजाच्या स्मशानभूमीस भेट देऊन रस्त्या दुरवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत मनपाचे कनिष्ठ अभियंता शेख अर्शद शेख आयुब हे होते.

स्मशानभूमीच्या रस्त्याची पाहणी केल्यानंतर अतिरिक्त आयुक्त यांनी मनपा कनिष्ठ अभियंता व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दहा दिवसाच्या आत स्मशानभूमीचा रस्ता पूर्ण करून मुख्य रस्त्यावर पाईप टाकावा व परिसरातील नाले जेसीबीच्या साह्याने मोकळे करून घ्यावेत अशा सूचना दिल्या.यामुळे मागील अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या दशनाम गोसावी समाजाच्या स्मशानभूमीचा रस्त्याचा मार्ग मोकळा होणार असून प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागणीला यश मिळाले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या