🌟परभणी महानगर पालिकेने केलेल्या रस्ते आणि करवाढी विरोधात शिवसेना स्टाईलने आंदोलन...!


🌟परभणी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल पाटील यांचा इशारा🌟


परभणी :  मनपाने लागू केलेली नवीन भरमसाठ करवाढ तात्काळ मागे घ्यावी. तसेच शहरातील रस्त्यांच्या प्रश्‍नासह धुळीचा प्रश्‍न 20 ऑगस्ट पर्यंत सोडवावा, अन्यथा या विरोधात शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा आमदार डॉ.राहुल पाटील यांनी दिला आहे.

           महानगरपालिकेने भरमसाठ करवाढ केली आहे. विविध स्वरूपातून नागरीकांच्या माथी नको ते कर मारण्यात आले आहेत. या अन्यायकारक करवाढीला नागरिकांचा प्रचंड विरोध होत आहे. त्यामुळे या प्रश्‍नावर आमदार डॉ. पाटील यांनी यापूर्वीच महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांची भेट घेऊन त्यांच्याशी अन्यायकारक करवाढीच्या विषयावर चर्चा करीत ही करवाढ मागे घेण्याची मागणी केली होती. परंतू अद्यापही मनपा प्रशासनाने करवाढीच्या प्रश्‍नावर कोणताही सकारात्मक निर्णय घेतला नसल्याने आमदार डॉ. पाटील संतप्त झाले आहेत.

           शहरातील नागरीकांना कुठल्याही प्रकारच्या मुलभूत नागरी सुविधा देण्यात महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. महापालिकेवर सध्या प्रशासकांचा कारभार सुरू असून तो अत्यंत हुकूमशाही पध्दतीने सुरू आहे. नागरीकांच्या कुठल्याही समस्यांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे असुविधांचा सामना करणार्‍या परभणीकरांवर केलेली अन्यायकारक करवाढ ही नियमबाह्य आहे. त्यामुळे नवीन करवाढ तात्काळ मागे घ्यावी. तसेच शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये व्यापाजयांना आकारलेला मालमत्ता कर देखील मागे घ्यावा अशी मागणी आ. डॉ. पाटील यांनी केली आहे.

           शहरातील सर्वच रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. शहरातील मंजूर आठ रस्त्यांची कामे अजूनही सुरू झाली नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवले नसल्याने शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे तात्काळ शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवून त्या आठ रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लावावा, अशीही मागणी आ.डॉ.पाटील यांनी केली आहे.

            याशिवाय शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे फिरत आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होण्यासह अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून कोंडवाड्याचे टेंडर शासनाच्या परिपत्रक 2006च्या नियमानुसार काढावे, अशी मागणी करण्यात आली. या सर्व मागण्या 20 ऑगस्ट पर्यंत पूर्ण न झाल्यास मनपा समोर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आ.डॉ.पाटील यांनी दिला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या