🌟परभणीच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदी अनुराधा ढालकरी रुजू....!


🌟त्यांनी प्रभारी‍ निवासी उपजिल्हाधिकारी दत्तु शेवाळे यांच्याकडून पदभार स्वीकारला🌟

परभणी (दि.३० ऑगस्ट २०२३) : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी पदी श्रीमती अनुराधा ढालकरी या आज रुजू झाल्या. त्यांनी प्रभारी‍ निवासी उपजिल्हाधिकारी दत्तु शेवाळे यांच्याकडून पदभार स्वीकारला.

श्रीमती ढालकरी यांनी यापूर्वी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त निवासी उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना, भूसंपादन अधिकारी, सामान्य प्रशासन, जिल्हा पुरवठा अधिकारी आदी विविध विभागाच्या उपजिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तसेच पुर्णा येथे तहसीलदार तर वसमत येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या