🌟इंजेगावचे भुमिपुत्र उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड व शिक्षक सोपान कराड यांच्या सेवानिवृत्त...!


🌟सेवानिवृत्ती निमित्तानं कौतुकास्पद उपक्रम🌟

🌟सरपंच सौ.विद्या अमोल कराड गावातील प्रत्येक मुलिंच्या लग्नासाठी देणार 11 हजार रुपये🌟

🌟जिल्हा परिषद शाळेत बसविणार पाणी फिल्टर🌟

परळी वैजनाथ (दि.०१ आगस्ट २०२३) - शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून इंजेगावचा नावलौकिक वाढविणारे गावचे भूमिपुत्र बीड जिल्हा परिषदेचे उप शिक्षणाधिकारी हिरालाल कराड व उखळी (ता. सोनपेठ) सोपानराव कराड हे दोघेही आज एकाच दिवशी सेवानिवृत्त होत आहेत. या भूमिपुत्रांच्या निवृत्तीचे निमित्त साधून इंजेगावच्या सरपंच सौ. विद्या अमोल कराड यांनी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. आजपासून गावातील प्रत्येक मुलिच्या लग्नाला 11 हजार रुपयांचे सहकार्य केले जाणार आहे तर दोघेही शैक्षणिक क्षेत्रातील असल्याने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वाॅटर फिल्टर बसविण्यात येणार आहेत.

        माध्यमिक शिक्षक ते उप शिक्षणाधिकारी असा प्रवास करून शैक्षणिक क्षेत्रात अतिशय भरीव काम केलेले बीड जिल्ह्याचे उप शिक्षणाधिकारी हिरालाल कराड हे आज दि. 31 जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत. माध्यमिक शिक्षक म्हणून नोकरी करीत असतानाच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन ते जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून बीडला रूजू झाले. आपल्या 35 वर्षाच्या सेवा काळात त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. तर सोपानराव कराड यांनी माध्यमिक शिक्षक म्हणून सेवा केली आहे. हे दोघेही सख्खे चुलत भाऊ आहेत.

        हिरालाल कराड आणि सोपान कराड या दोघांनीही नोकरी करीत असुनही गावातील विविध उपक्रमात सहभाग घेतला आहे. गावातील प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होत त्यांनी गावातील होतकरू तरुणांना पुढे जाण्यासाठी सहकार्य केले आहे. त्यांनी गावासाठी केलेल्या सहकार्याची जाणीव ठेवत गावच्या सरपंच सौ. विद्या अमोल कराड यांनी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. दोघांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने येथुन पुढे गावातील प्रत्येक मुलिच्या लग्नाला 11 हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे. तर दोघेही शैक्षणिक क्षेत्रातील असल्याने याच निमित्ताने जिल्हा परिषद शाळेला वाॅटर फिल्टर बसविण्यात येणार असल्याची माहिती सरपंचपती अमोल कराड यांनी दिली आहे.

* शैक्षणिक चळवळ गतीमान केल्याने गौरव :-

       उप शिक्षणाधिकारी हिरालाल कराड यांनी आपल्या कार्यकाळात शिक्षणाचा लाभ ऊसतोड मजूरांची मुले, विटभट्टी कामगारांची मुले अशा घटकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. शाक्षणापासुन कुणिही वंचित राहणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. हे करताना गावची नाळ कायम ठेवत गावातील मुलांना मार्गदर्शन आणि सहकार्य केले. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीच्या निमित्ताने मुलीच्या लग्नासाठी 11 हजार रुपये मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

*अमोल कराड*

इंजेगाव

* अनेक विद्यार्थ्यांना घडविल्याने सन्मान :-

       सोपानराव कराड यांनी शिक्षक म्हणून सेवा करताना अनेक विद्यार्थी घडविले आहेत. त्यांनी अनेक अधिकारी घडवले असुन त्यांनी गावातील अनेक गरजू विद्यार्थ्यांनाही वेळोवेळी मदत केली आहे. त्यांनी गावातील चांगल्या कामाला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे ग्राम पंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान म्हणुन गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून वाॅटर फिल्टर बसविण्यात येणार आहे.

सौ.विद्या अमोल कराड

सरपंच - इंजेगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या