🌟मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम....!


🌟नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांची प्रमुख उपस्थिती🌟


   
परभणी (दि.२६ ऑगस्ट २०२३) : राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी या परभणी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्या रविवार दि.२७ ऑगस्ट रोजी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले आहे.


राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या नियोजित कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी ११.३० वाजता वसंतराव नाईक‍ मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रीष्म वसतिगृहासमोरील क्रीडा संकुल येथे होणार आहे. यावेळी खासदार डॉ. फौजिया खान, खासदार संजय उर्फ बंडु जाधव, विधान परिषद सदस्य सर्वश्री सतीश चव्हाण, विक्रम काळे, अब्दुल्लाह खान अ.लतीफ खान उर्फ बाबाजानी दुर्राणी, विप्लव बाजोरिया, आमदार सुरेश वरपुडकर, डॉ. राहुल पाटील, श्रीमती मेघना साकोरे- बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, विभागीय आयुक्त मधुकर अर्दड आणि नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

तरी जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपसि्थत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून आणि पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर.मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या