🌟राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी मुंबईत घेतली सदिच्छा भेट...!


🌟याप्रसंगी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली🌟

मुंबई : गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी आज गुरुवार दि.३१ आगस्ट रोजी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच परभणी येथील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेले दमदार भाषण आणि विकास कामांची केलेली घोषणा यामुळे त्यांचे मनस्वी आभार मानले.

याप्रसंगी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच परभणी शहरासह जिल्ह्यातील प्रलंबित व संभाव्य विकासकामे याचीही सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतली यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे सुपुत्र सुनिल गुट्टे हे देखील उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या