🌟परभणी शहरातील माळी गल्ली येथील पुरातन शिव मंदिर भाविकांकरिता खुले करा....!


🌟जनभावना प्रशासनातर्फे निदर्शनास आणून देऊन योग्य ती कार्यवाही करावी असे निवेदनात नमुद केले आहे🌟

परभणी शहराच्या मध्यवस्तीमध्ये क्रांती चौकात माळी गल्ली प्राचीन शिव मंदिर असुन सदर प्राचीन मंदिर पूर्णत दगडी बांधकामात झालेले असुन सदर बांधकाम आणि मंदिर प्रथम दृष्ट्या पाहताक्षणी अतिशय प्राचीन पुरातन व हेमाडपंथी असल्याबाबत शंका उरत नाही.


सदर मंदिर या बाबत जनतेमध्ये व्यापक श्रद्धा असुन सर्व सामान्य जनतेमध्ये हे महादेव मंदिर असुन मंदिरामध्ये शिवलिंग असल्याचे व सदर मंदिर शिव मंदिर असल्याबाबत व्यापक जनभावना दिसुन येते. तसेच मागील काही दशकापासून सदर मंदिर बंद अवस्थेतमध्ये असुन सर्व सामान्य जनतेस याचा वापर करता येऊ नये म्हणून मंदीराच्या दरवाजा बाहेर प्रशासनातर्फे कायम पोलीस पहारा ठेवण्यात आला आहे. मंदिर सर्व सामान्य जनतेस दर्शनासाठी खुले नसल्यामुळे तीव्र नाराजी व प्रक्षुब्ध जनमानस दिसुन येत आहे. प्रस्तुत निवेदनाद्वारे ह्याच जनभावना प्रशासनातर्फे निदर्शनास आणून देऊन योग्य ती कार्यवाही करावी असे निवेदनात नमुद केले आहे.

सदरील मंदिरा बाबत मिळालेली माहिती नुसार सदर प्रकरणात प्रशासकीय स्तरावर सर्व संबंधित व जनतेचे हितसंबंध म्हणणे ऐकून प्रशासनाने हे शिव मंदिर असल्याबाबत व त्याचा ताबा शिव भक्तांकडे सोपवणे बाबत हा अंतिम निर्णय झालेला असुन देखील त्यात अपिलीय प्रकरणे  होऊन वरील निर्णय कायम करण्यात आलेला आहे. तसेच सदर निर्णय अंतिम असुन प्रकरण अद्यापही निर्णय होऊनही परभणी शहरातील व इतर शिव भक्त यांना सदर मंदिराच्या पूजा विधी व इतर धार्मिक कार्यासाठी रोखले जात आहे. याचे कारण आजही स्पष्ट होत नाही. याबाबत देखील जनभावना तीव्र असुन प्रशासनाद्वारे याकडे गाभिर्यान्ने लक्ष पुरवण्याची विनंती करण्यात येत आहे.

सदरील मंदिर स्थापथ्य शाश्त्रच्या दृष्टीकोणातून देखील अत्यंत महत्वपूर्ण असुन सदर मंदिराचे दगडी खांबे व इतर दगडी काम देखील शेकडो वर्षांपुर्वीपासून  अस्तीत्वात  व अतिप्राचीन बांधकाम असल्याचे स्पष्ट होते. वरील संघर्षीय बांधकाम याचे स्थापथ्य शास्त्रीय दृष्टीकोणातून विचार केल्यास ही बाब अधिक स्पष्ट होईल तसेच सदर मंदिराच्या अंतर्गत भागात प्राचीन शिव पिंड असल्याचे कळते. तसेच मंदिर स्थानावर इतर कोणतीही पूजा पद्धती चालु नसुन त्याचा वापर होत नाही दीर्घकाळ वापर होत नसल्यामुळे प्रशासनाची अनास्था व नैसर्गिक कारणामुळे सदर शिव मंदिर पडित अवस्थेत राहिले आहे व मंदिर हळूहळू नस्ट होत आहे. मंदिराच्या बांधकामाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. व सदर प्रश्न जनतेच्या आस्थेचा असुन प्रशासनाकडून याबाबत त्वरित लक्ष पुरवण्याची व मंदिराच्या सुव्यवस्थीत देखभालासाठी तसेच मंदिराच्या बांधकामाबाबत त्वरित लक्ष पुरवुन जनतेच्या वापरासठी त्वरित खुले करणे गरजेचे आहे सदर मंदिराबाबत प्रशासनाने लवकरात लवकर चौकशी करून यौग्य कार्यवाही करावी व  मंदिर शिव भक्तांसाठी खुले करण्यात यावे अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रशासनास देण्यात आला.

         यावेळी माझ्या सोबत,संघटन सरचिटणीस अँड. एन.डी.देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय शेळके, मोहन कुलकर्णी, सरचिटणीस संजय रिझवाणी, मा.नगरसेवक मधुकर गव्हाणे, रितेश जैन, जिल्हाउपाध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल, विजय गायकवाड, संजय कुलकर्णी, सिकंदर खान, सांस्कृतिक आघाडी संयोजिका विजया कातकडे, शकुंतला मठपती, रोहिणी हालगे,तालुका सरचिटणीस गणेश देशमुख, दिपक शिंदे, शिंदे, निरज बुचाले, प्रियंका खडके, आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या