🌟पुर्णेचे भुमीपुत्र तथा रेल्वे सुरक्षा बलाचे फौजदार शेख जावेद यांचा प्रमाणिकपणा....!


🌟रेल्वेत सापडलेला मोबाईल व बॅग प्रवाशाला परत करीत दाखवली कर्तव्यदक्षता व प्रामाणिकपणा केला🌟

परभणी (दि.२५ आगस्ट २०२३) - परभणी जिल्ह्यातील पुर्णेचे भुमीपुत्र तथा रेल्वे सुरक्षा बलाचे कर्तव्यदक्ष फौजदार शेख जावेद यांनी प्रामाणिकपणाचा प्रत्यय देत आज शुक्रवार दि.२५ आगस्ट २०२३ रोजी रेल्वे प्रवास्याची रेल्वे डब्ब्यातील सिटवर विसरलेली बॅग त्यात कपडे व काही कागदपत्रे व रोख रक्कम व एक वन प्लस कंपनीचा मोबाईल किंमत रुपये ३० हजार असा मुद्देमाल त्या प्रवास्याला वापस देऊन आपल्या कर्तव्यतत्परतेसह प्रामाणिक सिध्द केला.

या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील वडगाव निळा येथील रेल्वे प्रवासी नामे करण शाम अवचारे हे पुणे ते नांदेड पनवेल एक्सप्रेस ने प्रवास करीत असताना घाईत गंगाखेड रेल्वे स्टेशन येथे उतरत असताना आपली बॅग त्यात कपडे व काही कागदपत्रे व रोख रक्कम व एक वन प्लस कंपनीचा मोबाईल किंमत रुपये ३० हजार चुकून गाडीतील सीटवर विसरून गेले होते नंतर त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित गंगाखेड येथे कर्तव्यावर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे फौजदार श्री शेख जावेद व कॉन्स्टेबल प्रशांत गवळे कळविले ही माहिती मिळताच शेख जावेद कॉन्स्टेबल मीना व प्रशांत गवळे यांनी परभणी रेल्वे स्टेशन येथे शोध घेतला असता प्रवासीच्या सीटवर वरील सामान मिळून आले.सदरील मोबाईल व बॅग आणि इतर वस्तू हे परभणी स्टेशन येथे प्रवासी करण अवचारे यांना सुपूर्द करण्यात आले.रेल्वे सुरक्षा बलाचे फौजदार शेख जावेद,कॉन्स्टेबल मीना व प्रशांत गवळे यांनी केलेल्या प्रमाणिक कार्य व समर्पित सेवा बद्दल प्रवासी वर्गात ने समाधान व्यक्त केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या