🌟पुर्णा शहरासह तालुक्यात फिरणाऱ्या मोकाट जनावरांना लम्पी चर्मरोगाची लागन : प्रशासन निद्रिस्त ?


🌟जिल्हा प्रशासनाने स्थानिक प्रशासनासह पशु वैद्यकीय रुग्नालयांना आदेश देऊन मोकाट प्राण्यांचे लसीकरण व उपचार करावे🌟


परभणी/पुर्णा (विशेष वृत्त) - परभणी जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी नुकतेच काल शनिवार दि.२६ ऑगस्ट २०२३ रोजी प्रसिध्दी पत्रकाद्वारे जिल्ह्यात प्राण्यांमधील संक्रामक आणि सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ अनुसार लम्पी चर्मरोगा बाबत सतर्कता जाहीर करीत संपूर्ण परभणी जिल्हा लम्पी आजाराबाबत सतर्क क्षेत्र असल्याचे घोषित केले आहे. 


परभणीचे सन्माननीय जिल्हाधिकारी प्राण्यांमधील संक्रामक आणि सांसर्गिक रोग असलेल्या लम्पी आजारा बाबत सतर्कता दाखवत असले तरी जिल्ह्यातील तालुक्यातील तसेच गावपातळीवरील प्रशासकीय यंत्रणा मात्र या लम्पी आजाराबाबत गंभीर नसल्याचे निदर्शनास येत असून यात पुर्णा तालुका आघाडीवर असल्याचे दिसत आहे पुर्णा शहरासह तालुक्यात असंख्य मोकाट गाई-वळू,मोकाट गाढव मोकाट डुकर मोकाट पिसाळलेले कुत्रे आदी प्राणी सर्वत्र धुमाकूळ घालीत असुन यातील अनेक मोकाट प्राण्यांना संसर्गजन्य संक्रामक रोगांची लागन झालेली आहे यात काही मोकाट वळूंसह गाईंना लम्पी लम्पी चर्मरोगाची लागन देखील झाल्याचे निदर्शनास येत असून या जनावरांचा अन् पाळीव जनावरांसह सर्वसामान्य नागरिकांशी देखील संपर्क होत असल्यामुळे लम्पी आजारासह मोकाट डुकर कुत्रे या प्राण्यांना गंभुर चर्मरोगांची लागन तसेच मोकाट गाढवांना गंभीर जखमा होऊन त्यात आळ्या झाल्याचेही निदर्शनास येत असून या मोकाट प्राण्यांमुळे शहरासह तालुक्यातील गावपातळीवरील नागरिकांच्या आरोग्य व्यवस्थेवर देखील गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे स्थानिक प्रशासनाने याकडे गंभीरपणे लक्ष देऊन पशु वैद्यकीय रुग्नालयांना आदेश देऊन या मोकाट प्राण्यांचे लसीकरण व उपचार करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे...   

 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या