🌟कांदा निर्यात शुल्क रद्द करावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी......!


🌟कांदा निर्यात धोरण शेतकरी विरोधी अंबादास दानवेंची सरकारवर टीका🌟

✍️ मोहन चौकेकर

मुंबई (दि.२२ ऑगस्ट २०२३) -  कांदा निर्यातीवर ४०टक्के शुल्क लावण्याचा केंद्राने घेतलेला निर्णय एकप्रकारे कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लावण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. तसेच कांदा निर्यात शुल्क रद्द करावा, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

  राज्य सरकारने कांद्याला ३५० रुपये अनुदान देण्याच आश्वासन विधिमंडळात कबूल केलं होत मात्र आज २२ ऑगस्ट आलं तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याच आश्वासन अद्याप पाळल नाही.आयात निर्यात धोरण हे शेतकऱ्यांचे फायद्याचे नाही तर व्यापाऱ्यांच्या फायद्याचे आहे. सरकारने कांदाप्रश्नी तोंड देखलपणा करण्याची गरज नाही, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न करत  अंबादास दानवे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन पेटणार असल्याचे म्हटले.

* तलाठी परिक्षा :-

अनेक जिल्ह्यात सर्व्हर डाऊन झाल्यामुळे तलाठी परीक्षा नीट होऊ शकली नाही. त्यामुळे परीक्षा घेणाऱ्या एजन्सीना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

खारघर, समृद्धी महामार्ग दुर्घटना , कळवा येथील रुग्णालयात उपचाराअभावी मृत्युमुखी पडलेले रुग्ण यावर सरकार फक्त भेटी देऊन पैसे देते मात्र ठोस उपाययोजना करत नाही. या सर्व ठिकाणी सुविधा सुधारण्याची गरज आहे.महानगरपालिकेला जनतेच्या जीवाची घेणं देणं नाही अस म्हणत अंबादास दानवे यांनी सरकारच्या अनागोंदी कारभारावर निशाणा साधला.

* कोकण महामार्ग :-

कोकणवासीयांनी केंद्र व राज्य सरकारला साथ साथ देऊन देऊन रस्त्याची चाळण झाली. खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोकण महामार्गच रस्ते झालं नाही हे माझं अपयश असल्याचं कबूल केलं. केंद्र व राज्यात भाजपचे सरकार आहे. कोकणवासीयांचा त्यांनी अंत पाहता कामा नये, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोकण महामार्गाच्या रस्त्यावर प्रतिक्रिया दिली....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या