🌟ब्राह्यण समाजा विरोधात टिका-टिप्पणी करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांचा विश्‍वव्यापी ब्राह्मण महासंघातर्फे निषेध....!


🌟यावेळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विठुगुरू वझुरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟  


परभणी (दि.२२ आगस्ट २०२३) : राज्याचे मंत्री छगन भूजबळ यांनी ब्राह्मण समाजावर केलेल्या टिका-टिप्पणीचा विश्‍वव्यापी ब्राह्मण महासंघाने एका निवेदनाद्वारे तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

           या महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विठुगुरू वझुरकर, स्वप्नील पिंगळकर, योगेश सोनपेठकर आदींनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात भुजबळ यांच्या आक्षेपार्ह विधानावर कडाडून टीका केली. भूजबळ हे सातत्याने या पध्दतीची विधाने करीत समाजात अशांतता निर्माण करीत आहेत. त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त होत असून त्यांनी तात्काळ माफी मागावी, अन्यथा प्रत्येक जिल्ह्यात भूजबळ यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या