🌟परभणी जिल्ह्याचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी घेतले श्रीक्षेत्र पोहरादेवीचे दर्शन....!


🌟अखिल भारतीय बंजारा समाज सामुदायिक संमेलना निमित्त ते यावेळी उपस्थित होते🌟


 परभणी जिल्हयाचे लोकप्रिय खासदार संजयजी ऊर्फ (बंडू) जाधव यांनी काल बुधवार दि.३० आगस्ट २०२३ रोजी बंजारा समाजाची काशी श्रीक्षेत्र पोहरादेवी गड येथे संत श्री सेवालाल माहाराज समाधी व संत श्री रामराव महाराज समाधी तसेच जगदंबा मातेचे दर्शन घेतले व आयोजित कार्यक्रमात त्यांनी आपल्या भावना प्रकट केल्या.


अखिल भारतीय बंजारा समाज सामुदायिक संमेलना निमित्त ते यावेळी उपस्थित होते समाज धर्मगुरू परमपूज्य श्री बाबुसिंगजी महाराज, गुरू श्री नेहरू महाराज, गुरू श्री सुनील माहाराज, गुरू श्री शेखर महाराज व गुरू श्री जितेन्द्र महाराज यांचे आशीर्वाद त्यांना यावेळी प्राप्त झाले. तसेच यानिमित्त कवी, प्रबोधनकार व मान्यवरांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या