🌟मी पुर्णा जंक्शन बोलतोय.....पुर्णा जंक्शनचा आर्ट टाहों....!


🌟अरें 'आपली माती आपली मानस' आपल्याच मातीतले लाचार संधीसाधू आपल्याशी गद्दार झाले अन्....🌟

राजकीय सुडनाट्यात प्रत्येक घावावर घाव मी सहन केले....माझ्या वैभवात भर घालणारे शासकीय कार्यालयरूपी अंग आसूरांनो तुम्हीं अक्षरशः छाटून छाटून नांदेड,हिंगोली,लातूर,बिड जिल्ह्यात नेले...हजारों रेल्वे कामगार शेकडो गजबजलेली रेल्वेची निवासस्थाने अन् कोट्यावधीच्या संपत्तीच्या धुळधानीला तुम्ही अंधत्व पत्करून धृतराष्ट्र बनत जवाबदार झाले...अरें 'आपली माती आपली मानस' आपल्याच मातीतले लाचार संधीसाधू आपल्याशी गद्दार झाले अन् दलालीच्या हव्यासापोटी दिड दमडीवर विकल्या गेले....तिन/साडेतील दशकापुर्वी नंदनवना प्रमाणे फुललो होतो मी पण तुमच्या धृतराष्ट्री अन् संधीसाधू प्रवृत्तीमुळे मुर्खानो माझे अक्षरशः स्मशानात रुपांतर झाले....पुर्णा-गोदावरी नदी काठावरील अन्नपुर्णा नगरी म्हणून ओळख होती माझी अरे दुष्टांनों तुमच्या कर्म दारिद्रीपणाच्या लक्षणामुळे अन्न पाण्याला मौताज तुम्ही मला केले....ग्राहकांनी गजबजलेली शहरातील माझी व्यापारपेठ औद्योगिक क्षेत्रातही होतो मी आघाडीवर कृषी क्षेत्रही होते माझे सर्वात पुढे पण तुमच्या अकार्यक्षमतेने सर्व गतवैभवच माझे उध्वस्त झाले...उद्योग धंद्यातील माझी झालेली पिछेहाट अन् अविचारी लाचार संधीसाधू गद्दारांनो तुम्ही बेरोजगारी आणि बेकारीचा वाढवलेला थाट हजारो युवकांच्या जिवनाची तुम्ही तर लावली वाट अरे भावी पिढीच्या उभ्या आयुष्याला तुम्ही दाखवली नर्खाचीच रें वाट....'कुटील अन् कट कारस्थानी डावावर तुमचे' माझ्या उध्वस्त आयुष्याला कारणीभूत झाले....अरें राजकीय कुंटनशाहीतील दलालांनो तुम्हीच ठरले माझे कर्दनकाळ अरें दलालांनो दलालीलाच तर तुम्ही सातत्याने प्रोत्साहन दिले अन् आपल्याच माते समान मातृभुमीच्या विध्वंस विनाशास तुम्ही कारणीभूत झाले....परभणी हिंगोली या संयुक्त जिल्ह्यातील एकमेव सुधारित तालुका म्हणून होती ओळख माझी तुम्हींच आसुरांनो माझ्या सर्वांगिन विनाशाचे पाईक झाले....दंगल जाळपोळ मारामारी सर्वसामान्य जनता व्यापाऱ्यांसह आपल्याच समर्थक कार्यकर्त्यांशी देखील गद्दारी करीत त्यांना जागृक नागरिक बनवण्याऐवजी तुम्ही आसुरांनों गुन्हेगार केले.....

✍🏻'परखड सत्य' - चौधरी दिनेश (रणजीत)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या