🌟नांदेड-जालना समृध्दी महामार्गाच्या भुसंपादनाची प्रक्रिया तातडीने थांबवा....!


🌟अशी मागणी शेतकरी संघर्ष कृती समितीने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे🌟

परभणी (दि.२८ आगस्ट २०२३) : जालना-नांदेड या समृध्दी महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया शासनाने तातडीने थांबवावी अशी मागणी शेतकरी संघर्ष कृती समितीने परभणी जिल्हा प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

   जालना ते नांदेड या समृध्दी महामार्गावरील बाधित शेतकर्‍यांवर मूल्यांकनातून केलेला अन्याय दूर करण्याकरीता व्यापक बैठक आयोजित करण्यात आली दि.३० ऑगस्ट २०२३ रोजीची ही बैठक काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. परंतु, भूसंपादनाची प्रक्रिया ही निरंतर सुरु आहे. त्यामुळे भविष्यात शेतकर्‍यांवर कोणताही अन्याय होवू नये म्हणून त्या बैठकीचा निर्णय पुढे येईलपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी या समितीचे गोविंदराव घाटोळ, राम मोरे, विठ्ठल धस, तुकाराम वाघमारे, खाजा काझी, रामेश्‍वर झुरे, संजय लांबादे, बबनराव मुंडे, योगेश भालेराव, माऊली मुंढे, कुंडलिक जोगदंड, शिवाजी शेंद्र, गणेश आवरगंड, नारायण आवरगंड, बालासाहेब मुंडे, दीपक चापके, अजयराव मुंडे आदींनी केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या