🌟जळगाव येथील राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीच्या पथकाची धाड : व्यापाऱ्यांमध्ये माजली खळबळ....!


🌟राजमल लखीचंद ज्वेलर्स माजी खासदार इश्वर जैन व माजी मनीश जैन यांच्या मालकीचे🌟

जळगाव : खान्देशची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव येथील माजी खासदार इश्वर जैन व माजी मनीश जैन यांच्या मालकीचे 'राजमल लखीचंद ज्वेलर्स'वर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या पथकाने धाड टाकल्याचे वृत्त नुकतेच हाती आले पथकाने कारवाई करत चौकशी सुरु केली आहे. या कारवाईमुळे जळगावातील व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

राजमल लखीचंद ज्वेलर्सने स्टेट बँकेकइून घेतलेल्या थकीत कर्जाज्या संदर्भात ईडीच्या पथकाने कारवाई करत चौकशी सुरु केली असल्याचे सांगण्यात येत आहे मुंबई,नागपूर,औरंगाबादसह विविध जिल्ह्यातून ईडी पथकाच्या १० गाड्या एकाच वेळी जळगाव जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत.

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या जळगावसह नाशिकमधील एकूण सहा फर्मवर एकाच वेळी छापेमारी केली. सर्व ठिकाणाच्या फर्मवर असलेल्या मालमत्ता आणि कागदपत्रांची ईडीकडून तपासणी सुरु कैली असल्याचे बोलले जात आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीचे एकूण ६० कर्मचारी अणि अधिकारी या कारवाईत सहभार्गी आहेत. दरम्यान सीबीआयने गेल्यावरषीदेखील राजमल लखीचंद ज्वेलर्सचे चौकशी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.....


のd:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या