🌟शिवसेना अल्पसंख्यांक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल मो.हाजी कुरेशींचा राष्ट्रवादी काँग्रेस कडून सत्कार...!


🌟पुर्णा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रताप कदम व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला सत्कार🌟

पुर्णा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा अल्पसंख्यांक समाजातील उभरते नेतृत्व मो.हाजी कुरेशी यांची शिवसेना (शिंदे) पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आज बुधवार दि.१६ आगस्ट २०२३ रोजी पुर्णा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रताप कदम यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

या सत्कार सोहळ्या वेळी माजी नगर सेवक तथा प्रतिष्ठित व्यापारी प्रविण अग्रवाल माजी नगरसेवक अमजद नुरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रताप कदम यांनी यावेळी हाजी कुरेशी यांना पुष्पहार व शाल घालून सत्कार केला यावेळी युवा नेते इरशाद उर्फ इश्यू पठाण,कृष्णा कदम यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती......   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या