🌟‘फिट इंडिया’ चळवळ ही भारतातील एक राष्ट्रव्यापी चळवळ : लोकांना शारीरिक व्यायाम व खेळाकरिता प्रोत्साहन...!


 


[विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना योगगुरू श्रीमती अनिता बोराळे व उपस्थित मान्यवर]

🌟विद्यार्थ्यांकरिता योगाभ्यासाची प्रात्यक्षिके योगाचार्य अनिता बोरोळे यांनी सादर केली🌟

परभणी (दि.२९ आगस्ट २०२३) - योग ही केवळ शारीरिक क्रिया नसून शरीर आणि मन यांना जोडणारा दुवा असल्याचे मत योगाचार्य श्रीमती अनिता बोरोळे यांनी व्यक्त केले.  

          येथील सामुदायिक विज्ञान महाविदयालय,वनामकृवी येथे ‘फिट इंडिया’अभियानांतर्गत राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात  योगाभ्यासाचे महत्व विशद करून विद्यार्थ्यांकरिता योगाभ्यासाची प्रात्यक्षिकेही त्यांनी सादर केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा  सहयोगी अधिष्ठाता  प्राचार्या डॉ.जया बंगाळे,डॉ.विद्यानंद मनवर राष्ट्रीय सेवा योजना  कार्यक्रम अधिकारी अदीची प्रमुख उपस्थिती होती .

           ‘फिट इंडिया’ चळवळ ही भारतातील एक राष्ट्रव्यापी चळवळ असून  त्यामुळे लोकांना शारीरिक व्यायाम व खेळ याकरिता  प्रोत्साहन मिळते  असे डॉ . विद्यानंद मनवर  प्रतिपादन केले. तसेच या प्रसंगी ‘फिट इंडिया’ चळवळीचे उद्दिष्ट्ये सांगून उपस्थित  महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना  ‘फिट इंडिया’ शपथ देण्यात आली.या निमित्ताने विद्यार्थ्यासाठी कर्मचा-र्यांसाठी विविध भारतीय  मनोरंजक खेळ , विविध गटात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.विद्यानंद मनवर , डॉ.सुनिता काळे जिमखाना  उपाध्यक्ष यांचे सहकार्य लाभले. 

यावेळी   डॉ.वीणा भालेराव, डॉ.जयश्री रोडगे, डॉ.इरफाना सिद्दिकी, प्रवीणकुमार दंडे, वैजनाथ जाधव, रमेश शिंदे, माणिक गिरी, प्रसाद देशमुख यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, रासेयो स्वयंसेवक  व  विद्यार्थ्यांनी  मोठ्या संख्येने  उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ सुनिता काळे यांनी केले....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या