🌟रानकवी म्हणून ओळखलला जाणारा शब्दांचा जादूगार हरपला....!


🌟प्रसिद्ध कवी ना.धों.महानोर यांचे निधन वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्र्वास🌟                 

✍️ मोहन चौकेकर 

प्रसिद्ध कवी,  गीतकार साहित्यिक माजी आमदार ना.धों. महानोर यांचं निधन झाले आहे. वयाच्या 81 व्या वर्षी कवी गीतकार ना. धों महानोर यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर मागच्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. उपचारांदरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. ना. धों. महानोर यांच्या निधनाने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.  ग्रामीण जीवन शब्दबद्ध करणारा, गावगाड्यातील गोष्टी सोप्या शब्दात मांडणारा संवेदशील माणूस हरपल्याची भावना साहित्य विश्वातून व्यक्त होत आहे.

नामदेव धोंडो महानोर हे ना.धों. महानोर यांचं संपूर्ण नाव. ते मूळचे छत्रपती संभाजीनगर / औरंगाबाद जिल्ह्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील/ औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पळसखेडा 16 सप्टेंबर 1942 गावात त्यांचा जन्म झाला. पळसखेडा, पिंपळगाव, शेंदुर्णी इथं त्यांनी शालेय शिक्षण घेतलं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुढे ते जळगावला गेले. पहिलं वर्ष संपताच त्यांना पुन्हा गाव खुणावू लागला. त्यांनी शालेय शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला अन् पुन्हा गाव गाठला. पण तिथे त्यांना जीवनाचा सूर गवसला. नजरेला दिसणारा निसर्ग त्यांनी शब्दात मांडला अन् महाराष्ट्राला मिळाला ‘रानकवी’!

ना.धों. महानोर यांचा लेखनी जेव्हा चालायची तेव्हा खुद्द निसर्ग कागदावर रेखाटला जायचा. म्हणूनच साहित्य विश्वाने त्यांना रानकवी ही उपाधी दिली. ना.धों. यांच्या लिखाणावर बालकवींच्या साहित्याचा प्रभाव जाणवतो.साहित्य विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कवी ना. धों. महानोर  यांचं निधन झालं आहे. उद्या संभाजीनगर /औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पळसखेड या त्यांच्यामुळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ना. धों. महानोर यांच्या ‘रानातल्या कविता'मधून प्रकाशित झालेल्या कवितांना खरा मातीचा गंध होता. त्यांच्या गीतांमधून आणि कवितांमधून निसर्गाचं दर्शन होत होतं. जेवढ्या सुंदर पद्धतीने त्यांनी निसर्गाचं वर्णन करणारी गीतं लिहिली, तेवढ्याच सुंदर पद्धतीने त्यांनी काही लावण्याही लिहिल्या. ना.धों. महानोर यांची 'श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना' ही लावणी खूचप लोकप्रिय झाली होती. ‘पानझड’, ‘तिची कहाणी' आणि 'पळसखेडची गाणी'मधून त्यांनी प्रकाशित केलेलं साहित्य कायम टवटवीत वाटतं.

ना धो. महानोर यांनी लिहिलेली जांबुळ पिकल्या झाडाखाली, चिंब पावसानं रान झालं आबादानी, नभ उतरू आलं, आम्ही ठाकर ठाकर, जाई जुईचा गंध, किती जीवाला राखायचं, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ही गाणी आजही अनेकांच्या ओठांवर येतात. त्यांच्या रानातल्या कविता, पावसाळी कविता जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांच्या रुपात प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. समाजभान असलेला, ग्रामीण संस्कृतीशी एकरुप झालेला साहित्यिक आणि प्रतिभावंत कवी गमावल्याने मराठी साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.

ना धो महानोर यांना मिळालेले पुरस्कार

कृषीभूषण (महाराष्ट्र शासन) इ.स. १९८५

भारत सरकारचा 'पद्मश्री' पुरस्कार, इ.स.१९९१

'वनश्री' पाणलोट पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल. इ.स १९९१

जागतिक चित्रपट महोत्सव गीतकार जीवन गौरव पुरस्कार, पुणे २०१५

साहित्य अकादमी पुरस्कार, इ.स. २००० - 'पानझड'

'कृषिरत्न' शेती क्षेत्रातील बहुमोल कामगिरीबद्द्ल सुवर्ण्पदक इ.स. २००४

डॉ. पंजाबराव देशमुख गौरव पुरस्कार इ.स. २००४

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार, इ.स. २००९

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (महाराष्ट्र शासन) (२०१२)

'मराठवाडा भूषण'

महानोर आणि त्यांच्या पत्नी सुलोचना यांना यशवंत-वेणू पुरस्कार (२०१७)

अनंत भालेराव स्मृतिपुरस्कार.

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या