🌟नांदेड ग्रामीण पोलिस स्थानकाच्या हद्दीतील राज सरपे हत्या प्रकरणातील टोळी विरुध्द मोक्का कायद्यान्यये कारवाई....!


🌟शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव यांच्या पथकाची धाडसी कारवाई : मा.न्यायालयात दोषारोप पत्र दाखल🌟 


नांदेड (दि.२६ आगस्ट २०२३) - नांदेड ग्रामीण पोलिस स्थानकाच्या हद्दीतील सिडको परिसरातील वसंत नाईक कॉलेज लगत दि.२५ फेब्रुवारी २०२३ रोजी राज प्रदीप सरपे या तरुणाचा निर्घृण खुन केल्याची घटना घडली होती या घटने प्रकरणी फिर्यादी नामे केशरचाई प्रदीप सरपे हिने दिलेल्या फिर्यादी जवाबा वरुन दि.२६ फेब्रुवारी २०२३ रोजी नांदेड ग्रामीण पोलिस स्थानकात गुरनं. १२२/२०२३ अंतर्गत कलम ३०२,३८६,१२० (ब),१४३,१४७,१४८१४९,३२३ भादवीसह कलम ३,४,२५,२७ भाहका कलम १३५ मुपोका अन्वये आरोपी नामे १) उकाजी उर्फ बाळा ऊर्फ विनोद पि.मधुकर सावळे,२) गोपीनाथ पिता बालाजी मुंगल,३) हर्पवर्धन पिता सुभाप लोहकरे,४)राजु ऊर्फ चिंधी महाजन धनकवाड ५) कुंदन संजय लांडगे ६) सुमीत संजय गोडबोले,७) विकास चंद्रकांत कांबळे ८) लहूजी ऊर्फ अवधुत पिता गंगाधर दासरवाड ९) किरण सुरेश मोरे यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास नांदेड ग्रामीण पोलिस स्थानकाचे पोउपनि राजेश डाकेवाड यांच्याकड़े देण्यात आला होता.

पोउपनि राजेश डाकेवाड यांनी गुन्हयाचा तपास करीत असतांना यातील आरोपीतांनी खून करणे,जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी उखळणे असे विविध प्रकारचे माला विरुध्द व शरीरा विरुध्द गुन्हे हे आर्थिक फायद्यासाठी संघटीत होवुन केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर टोळी प्रमुख व टोळी सदस्य विरुध्द मोक्का कलम ३ (I) (),(i),३(२),३(४) चा अंतर्भाव होणे करीता नांदेड जिल्हा पोलिस अधिक्षक नांदेड यांचे मार्फतीने मा.विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परीक्षेत्र नांदेड यांचे कड़े प्रस्ताव पाटविण्यात आला होता मा.विशेष पोलीस महानिरोक्षक नांदेड परीक्षेत्र, नांदेड यांनी सदर गुन्हयात मोक्का कलमाचा अंतभांव करण्या वावत मान्यता दिल्याने सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सिध्देश्वर भोरे उपविभाग इतवारा यांचे कड़े देण्यात आला त्यांनतर त्यांची बदली झाल्याने सदर गुन्हयाचा तपास श्री. सुरज गुरव,उपविभागीय पोलीस अधिकारी,उपविभाग नांदेड शहहर कड़े दिला. सदर गुन्हयाचा तपासात यातील आरोपीतांना अटक करुन मोक्का कायदयाच्या तरतुदी प्रमाणे कसोसीने व शास्वशुध्द पध्दतीने तपास करुन मा.पोलीस अधिक्षक साहेव,नांदेड यांचे माफतीने मा. अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कडे दोपारोप पत्र मंजुरी साटी पाटविण्यात आले होते मा. अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्या) महाराष্ट्र राज्य, मुंबई यांनी आज रोजी सदर आरोपी विरुध्द मोक्का कायदयाने मा.न्यायालयात दोपारोप पत्र दाखल करण्याची परवानगी दिली आहे.सदर आरोपी विरुध्द मा.मोक्का न्यायालय नांदेड येथे १४७ पानाचे दोपारोप पत्र दाखल करण्यात आले आहे.

सदर गुन्हयाचा तपास मा.श्री शशीकांत महावरकर,विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परीक्षे्र, नांदेड, मा.श्रीकृप्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड मा. श्री. अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक,नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सुरज गुरव,उपविभागीय पोलीस अधिकारी,उपविभाग नांदेड शहर,त्यांना मदतनिस म्हणुन श्री.राजेश डाकेवाड,पोउपनि पोस्टे नांदेड ग्रामिण, पोना/ 1812 शेख सत्तार, पोना/784 गजानन कदम,पोकों/242 प्रभु मोरे, पोकॉ/ 1335 अंकुश लांडगे यांनी महत्तवाची भुमिका बजावली असुन सदरील कामगिरीबाबत मा.वरीष्टांनी तपास पथकांचे कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या