🌟नाशिक जिल्ह्यात चक्क तहसीलदारच निघाला लाचखोर ?


🌟तहसीलदार नरेशकुमार बहिरम १५ लाखांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात🌟

नासिक (दि.०६ आगस्ट २०२३) :- नाशिक जिल्ह्यातील राजूर बहुला येथील नियमबाह्य अवैध मुरुम उत्खनन प्रकरणाची विल्हेवाट लावण्यासाठी चक्क तहसिलदारानेच १५ लाख रुपयांची लाच मागितल्याने संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली या प्रकरणातील सत्यता तपासल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वीपणे सापळा रचून लाचखोर तहसीलदार नरेशकुमार तुकाराम बहिरम यांस १५ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.


राजुर बहुला तालुका जिल्हा नाशिक येथील जमिनीच्या मालक यांच्या जमिनीमध्ये मुरुम उत्खनना बाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड,  स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम १,२५,०६,२२०/- याप्रमाणे दंड आकारणी केले बाबत आलोसे यांच्या कार्यालयाकडील आदेश आले होते. त्या आदेशाविरुद्ध जमिनीच्या मालक यांनी उपविभागीय अधिकारी, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते त्याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण पुनश्च फेर चौकशीसाठी नरेशकुमार बहिरम, तहसीलदार नाशिक यांच्याकडे पाठवण्यात आले होते. सदर मिळकती मधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर वापर झाल्याचे जमिनीच्या मालक यांनी त्यांचे कथनात नमूद केले होते. सदर बाबत पडताळणी करणे कामी आरोपी लोकसेवक यांनी जमिनीच्या मालक यांना त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला तालुका जिल्हा नाशिक येथे स्थळ निरीक्षण वेळी बोलावले होते. परंतु जमिनीच्या मालक या वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी यातील तक्रारदार यांना त्यांच्या वतीने कायदेशीर कारवाई कामी अधिकार पत्र दिल्याचे दिल्याने ते आरोपी लोकसेवक यांना स्थळ निरीक्षण वेळी भेटली असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती १५ लाख रुपये लाचेची मागणी केली व सदरील लाच मागणी केल्याचे पडताळणी पंचनामा वेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले. व मागणी केलेली लाचेची रक्कम आज दिनांक ०५/०८/२०२३ रोजी लाच स्वीकारली म्हणून आरोपी लोकसेवक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे.

सापळा अधिकारी संदीप घुगे, पोलीस निरीक्षक, सहसापळा अधिकारी स्वप्नील राजपूत, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पो. ना. गणेश निबाळकर, पो. ना. प्रकाश महाजन, पो. शि. नितीन नेटारे यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार, वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या