🌟शेगाव रेल्वे सुरक्षा बलाचे प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांनी रेकॉर्डेड आरोपीला घेतले ताब्यात...!


🌟रेसुबचे अधिकारी रंजन तेलंग यांच्या कार्यवाही मूळे चोरांना चांगलाच जरब बसला आहे🌟

शेगाव रेल्वे सुरक्षा बलाचे प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांच्या धडाकेबाज कार्यवाही  बद्दल ते कायम चर्चेत असतात . याचाच प्रत्यय काल गुरुवार दि.२४ आगस्ट २०२३ रोजी आला. सविस्तर वृत्त असे की मागील महिन्यात ०९ जुलै २०२३ ला रंजन तेलंग यांनी एका रेकॉर्ड वरील आरोपीस चोरीच्या उद्देशाने आलेल्या श्याम सुधाकर सोनवणे वय ४४ वर्ष राहणार आर्वी नाका जिल्हा वर्धा याला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली होती त्यानंतर या संशयित आरोपीने आज रोजी पुन्हा रेल्वे स्टेशन शेगाव येथील वाहन पार्किंग परिसरात झोपलेल्या प्रवाशांजवळ बसून चोरीच्या उद्देशाने संदिग्ध हालचाली केल्या ज्या तेलंग यांनी स्वतः आड घेऊन बघितल्या व त्याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई कार्यवाही केली. रंजन तेलंग यांच्या कार्यवाही मूळे चोरांना चांगलाच जरब बसला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या