🌟परभणी जिल्हा पोलिस दलाची उल्लेखनीय कामगिरी : जिल्ह्यात २५ लाखांचे १५६ मोबाईल हस्तगत....!


🌟अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक आर.रागसुधा यांनी दिली🌟

परभणी (दि.१४ आगस्ट २०२३) :  परभणी जिल्हा पोलिस दलाने कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कौतुकास्पद व उल्लेखनीय कामगिरी बजावत जिल्ह्यात २०२१ ते २०२३ या कालावधीत गहाळ मालमत्तेमध्ये मोबाईलचा आढावा घेवून जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती आर.रागसुधा यांनी हरवलेल्या मोबाईलचा शोध घेवून ते मोबाईल संबंधितास परत मिळवून देण्याच्या उद्देशाने विशेष मोहिम राबविली या माहिमेतून जिल्ह्यात २५ लाखांचे १५६ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

          स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण, सर्व पोलिस ठाण्यांचे ३६ अंमलदार, तसेच सायबर पोलिस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचार्‍यांमार्फत ही मोहिम राबविण्यात आली. विशेषतः १९ पोलिस ठाण्यात २१ ते २३ या कालावधीत गहाळ मालमत्तेचा शोध घेवून परभणी जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातूनही हे मोबाईल जप्त करण्यात आले,अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक आर. रागसुधा यांनी दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या