🌟परभणी जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ४.९ मिलिमीटर पाऊस.....!


🌟पुर्णा तालुक्यात २.२ मिलिमीटर पावसाची नोंद🌟 

परभणी (दि.२८ ऑगस्ट २०२३) : जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ४.९ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय पडलेल्या पावसाचा विचार केला असता, सर्वाधिक पाथरी तालुक्यात १०.६ मि.मी. पाऊस पडला आहे. पालम ८.६, मानवत ८.२, परभणी ७, गंगाखेड ६.२, सोनपेठ ३, पुर्णा २.२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिंतूर ०.९, तर सेलू तालुक्यात सर्वात कमी ०.२ मि.मी. पाऊस पडला आहे. औरंगाबाद विभागात गेल्या २४ तासात सरासरी २.७ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.....     

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या