🌟पुर्णा तालुक्यातील ताडकळस ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनहीतार्थ वृत्त प्रकाशित करणे पडले महागात ?


🌟पत्रकारासह दोन बंधू सैन्य दलात कार्यरत असलेल्या पठाण कुटुंबावर राजकीय दडपशाही जिल्हा प्रशासन लक्ष देईल का ?🌟


पुर्णा (विशेष वृत्त) - ग्रामीण भागात सर्वसामान्य जनतेच्या हिताशी बांधिलकी जोपासत जनहीतवादी पत्रकारीता करीत असतांना संबंधित पत्रकारासह त्याच्या निरपराध कुटुंबाला देखील भ्रष्ट बेईमानशहांसह राजकीय दडपशाहीला कश्या पध्दतीने सामोरे जावे लागत असते आणि या अमानुष दडपशाहीचा त्या पत्रकाराच्या कुटुंबातील सदस्यांवर काय परिणाम होत असतो याची कल्पना पत्रकारांच्या तथाकथित पुढाऱ्यांना काय कळणार ? राजकीय दहशतवादी बेबंदशहा तसेच अनैतिक व्यवसायांच्या माध्यमातून आपला कुंटशाही कारभार चालवणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तींकडून लोकशाहीचा चौथास्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारांचे सर्वात जास्त दमन ग्रामीण भागातूनच होत असते परंतु जाती/धर्माच्या नावावर आपल्या दृष्ट हृदयात विषारीवृत्ती जोपासणाऱ्यांना याची देखील यत्किंचितही जाणीव नसते की पत्रकाराला जात/धर्म नसतो केवळ जनहीतवादी पत्रकारीतेचा वसा घेऊन जनहीतवादी पत्रकारीतेच्या माध्यमातून लोकशाहीच्या मुल्यांचे जतन करणे हा एकमेव त्याचा खरा धर्म असतो.


भारतीय सैन्य दलात देश रक्षणासाठी सेवा बजावत असलेल्या पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील पठाण बंधूंचे कुटुंब देखील अश्या राजकीय दडपशहांच्या सुडनाट्याला बळी पडत असल्याचे नुकतेच समोर आले आहे ताडकळस येथील जेष्ठ नागरिक मुनवर खान पठाण अत्यंत धार्मिक व देशभक्त वृत्तीचे त्यांनी आपल्या तिन मुलांपैकी दोन मुल अनवर खान मुनवर खान पठाण व नसिब खान मुनवर खान पठाण देश रक्षणासाठी भारतीय सैन्य दलात पाठवली मोठा मुलगा अनवर खान पठाण पंजाब राज्यातील फिरोजपूर सिमेवर देश रक्षणाची जवाबदारी पार पाडत असुन दुसरा मुलगा नसीब खान पठाण हे गुजरात राज्यातील कच्छच्या भारत-पाकिस्तान सिमेवर कर्तव्य बजावत आहे तर तिसरा मुलगा फेरोज खान पठाण जनहीतवादी पत्रकारीच्या माध्यमातून जनसामान्यांच्या हितासाठी आपली लेखनी झिजवत आहे.ताडकळस परिसरात पत्रकारीता करीत असतांना दि.२३ जुलै २०२३ रोजी फिरोज खान पठाण यांनी गावातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेमुळे जनसामान्यांना होणाऱ्या त्रासाकडे ताडकळस ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक वृत्त प्रकाशित केले ज्या वृत्तामुळे ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंचांसह ग्रामपंचायत प्रशासनाच्या अहंकाराला ठेस पोहोचली यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्यांच्या तात्पुरत्या दुरुस्तीच्या उद्देशाने दि.०२ आगस्ट २०२३ रोजी सर्वत्र मुरुम टाकला खरा परंतु पत्रकार फेरोज पठाण यांच्या घरासमोर रस्त्यावर टाकलेला मुरूम जाणीवपूर्वक पुन्हा उचलून नेऊन त्या ठिकाणी खड्डे केले त्यामुळे पठाण कुटुंबासह परिसरातील नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत असल्याचे दिसत असून या घटने संदर्भात त्यांनी परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी परभणी,जिल्हा पोलिस अधिक्षक परभणी,पंचायत समिती पुर्णा यांच्याकडे देखील तक्रार दाखल केल्या असून त्यांना व त्यांच्या कुटुंबाला जाणीवपूर्वक त्रास दिल्या जात असल्यामुळे सुडनाट्याला कुठेतरी प्रतिबंध व्हावा या उद्देशाने त्यांचे फेरोजपूर पंजाब येथे सैन्य दलात कार्यरत बंधू अनवर खान पठाण यांनी ताडकळस ग्रामपंचायतते सरपंच यांच्या मागील दोन आठवड्यापुर्वी मोबाईलवर संपर्क साधून त्यांना या संदर्भात विचारना करून रस्त्यावर मुरूम टाकून सहकार्य करण्याची देखील विनंती केली परंतु मुरुम तर सोडाच उलट पठाण कुटुंबाला वेगवेगळ्या पध्दतीने कसे छळता येईल या उद्देशाने षड्यंत्र रचल्या जात आहे.

जनहीतवादी पत्रकारासह त्याच्या देशभक्त कुटुंबावर होणाऱ्या या राजकीय दडशाहीकडे परभणी जिल्हाधिकारी गावडे लक्ष देतील काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून सदरील गंभीर प्रकार वेळीच थांबला नाही तर याकडे सैन्य दलाकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे लक्ष वेधल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही..... 

       

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या