🌟पुर्णा तालुक्यातील सुहागन येथे साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी...!


🌟यावेळी सुहागनच्या सरपंच श्रीमती रुक्मिणीबाई पांचाळ व उपसरपंच भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले🌟


पुर्णा (दि.२५ आगस्ट २०२३) - पुर्णा तालुक्यातील मौ.सुहागन येथे साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. यावेळी सुहागनच्या सरपंच श्रीमती रुक्मिणी बाई पांचाळ व उपसरपंच दाजीबा भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.घोडे सर हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून विनोद गायकवाड,गणेशराव भोसले (मजूर सोसायटी परभणी) रामोड सर, लोखंडे सर हे उपस्थित होते यावेळी प्रमुख वक्त्यांनी लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या व त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश पाडला. यावेळी अमृतराव कदम ( मार्केट कमिटी उपाध्यक्ष) बालाजी भोसले,सोनाजी पावडे,सटवाजी भोसले, वैजनाथ खरे,अरुण वाघमारे कार्यक्रम संयोजक, विनोद खरे राहुल खरे, विष्णुकांत वाघमारे, बालाजी वाघमारे, अनील वाघमारे, राम वाघमारे, तुळशीराम वाघमारे, नागोराव वाघमारे, मल्हारी वाघमारे, आत्माराम वाघमारे, गोपाळ वाघमारे, कृष्णा वाघमारे, ताज कृष्णा वाघमारे, सुशांत खरे तसेच जयंती मंडळाचे अध्यक्ष तुकाराम वाघमारे उपाध्यक्ष विकास वाघमारे सचिव इंद्रजित दुधगोंडे, अनिल वाघमारे. विष्णुकांत वाघमारे व साऊंड सिस्टचे साखरे आदींसह गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या