💥पुर्णा तालुक्यातील मौ.दस्तापुर येथील किर्तन सोहळ्यास आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांची आवर्जून उपस्थिती.....!


💥आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी किर्तनाचाही घेतला आनंद💥


गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी पुर्णा तालुक्यातील मौजे.दस्तापुर येथील पद्मावती देवस्थान परिसरात श्रावण मास निमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहून रसाळपूर्ण किर्तनाचा आस्वाद घेतला. 


प्रसिद्ध कीर्तनकार हभप.अच्युत महाराज दस्तापुरकर यांनी कीर्तन सेवा केली. आपल्या कीर्तनातून त्यांनी मानवी मूल्य, भौतिक प्रगती, सामाजिक विघटन, सुसंवाद महत्त्व, कौटुंबिक अधःपतन यावर अनुभवी आणि तार्किक भाष्य केले. त्यामुळे कीर्तन श्रवणीय झाले होते. याप्रसंगी हभप.अच्युत महाराज यांनी कर्तव्यदक्ष आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्यावर भरपूर स्तुतिसुमने उधळून तोंडभर कौतुक केले. 

यावेळी मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, सभापती बालाजी रुद्रवार यांच्यासह व्यापारी तसेच भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या