🌟परभणी जिल्ह्यातील योग शिक्षक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन.....!


🌟ग्रामीण भागातील जनतेला योगा बाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करून नागरिकांचे आरोग्य जोपासण्याचे काम शिक्षक करताय🌟

जिंतुर प्रतिनिधी/ बी.डी.रामपूरकर

जिंतूर  (दि.३० आगस्ट २०२३) : - परभणी जिल्ह्यातील योग शिक्षक संघटनेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

याबाबत निवेदनात खालील मागण्या असुन त्यामध्ये सध्या योग शिक्षकांना 500/- रुपये ऐवजी 1000/- रुपये मानधन करण्यात यावे ,आरोग्य केंद्र उपकेंद्र या ठिकाणी योग्य सत्र घेण्यासाठी प्रवास भत्ता 300/- रुपये देण्यात यावा, सामुदायिक आरोग्य अधिकारी  कायमस्वरूपी प्रतिमाह मानधन देण्यात यावे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, ग्रामीण भागातील जनतेला योगा बाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करून नागरिकांचे आरोग्य जोपासण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आम्ही करतो 2020 ते 21 पासून सध्याच्या धकाधकीच्या काळात योगकार्य ही काळाची गरज बनली असून आरोग्य केंद्र या ठिकाणी योग शिक्षक वाहनासह साहित्य घेऊन जावे लागते. सध्याचे मानधन हे अपुरे असल्याने प्रतियोगसत्र 100/- रुपये देण्यात यावे तसेच प्रवास भत्ता म्हणून 300/- रुपये देणेही गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी समुदाय आरोग्य अधिकारी प्रमाणे अकरा महिने अंतर्गत 11 महिने चे मानधन कायमस्वरूपी आम्हाला देण्यात यावे. यामुळे आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे भागू शकतो तरी सन्माननीय  मुख्यमंत्री साहेबांनी मागण्या मान्य करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली असून सदरील निवेदनावर योग शिक्षक परभणी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष गजानन चौधरी, जिल्हा सचिव लक्ष्मण  निरस जिल्हा समन्वयक सौ.विद्या खंदारे ,वसंत पारवे व जिल्ह्यातील अनेक योगेश शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या