🌟वाशिम शहर पोलिसांनी भाजपा रॅलीमध्ये चोरी करणारे ०२ सराईत चोरटे घेतले ताब्यात....!


🌟दोघांनीही चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांचेकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे🌟

✍🏻फुलचंद भगत

वाशिम :- वाशिम शहरात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली दि.२४ आगस्ट २०२३ रोजी आयोजित रॅली दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन पाटणी चौक येथे फिर्यादी गोविंद बालकिसन वर्मा यांच्या खिश्यातील ९,०००/-रु. चोरून नेण्याचा प्रकार घडला होता. फिर्यादीच्या तक्रारीवरून वाशिम शहर पोलिस स्थानकात सदर प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास करत असतांना प्राप्त गोपनीय हितीच्या आधारे दि.२७.०८.२०२३ रोजी संशयित आरोपी नामे १) सलिम खान अकबर खान, वय २६ वर्षे, व्यवसाय - पानपट्टी, रा.अकोट फैल, ता.जि.अकोला, २) गजानन सुखदेव साळोकार, वय ३२ वर्षे, व्यवसाय - ड्रायव्हर, रा.पाण्याच्या टाकीजवळ, घाटपुरी नाका, खामगाव, जि.बुलढाणा यांना ताब्यात घेऊन त्यांना सदर गुन्ह्यासंबंधाने विचारपूस केली असता दोघांनीही चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांचेकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस स्टेशन वाशिम शहर प्रभारी अधिकारी श्री.अमर मोहिते, पोनि.गजानन धंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.सचिन गोखले, पोहवा.लालमणी श्रीवास्तव, रामकृष्ण नागरे, पोशि. उमेश चव्हाण, संदीप दुतोंडे, राहुल चव्हाण, महादेव भीमटे यांनी पार पाडली....

प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या