🌟आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची घेतली भेट....!


🌟विरोधी पक्षनेतेच्या कामावरून आ.पवार यांनी केली प्रशंसा🌟  

✍️ मोहन चौकेकर 

संभाजीनगर : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयीन ठिकाणी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मागील एक वर्षापासून अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षनेते पदावर राहून केलेल्या कार्याची प्रशंसा केली. 


सत्ताधाऱ्यांच्या जुलमी राजवटीविरोधात एकत्र येऊन लढू अशी ग्वाही यावेळी आमदार रोहीत पवार यांनी दिली.आगामी काळात महाराष्ट्रात आपल्याला महाविकास आघाडी म्हणून जनतेसाठी कामे करायचे असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी अंबादास दानवे म्हणाले.यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक,अनंत तांदूळवाडीकर, तालुकाप्रमुख संजय मोटे व विभागप्रमुख लखन सलामपुरे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या