🌟जागतिक क्रीडाक्षेत्रात ध्यानचंद यांनी भारताची मान उंचावली - डॉ.भारत चापके


🌟असे प्रतिपादन क्रिडासंचालक डॉ.भारत चापके यांनी केले🌟

पुर्णा (दि.२९ आगस्ट २०२३) प्रतिनिधी - जागतिक क्रीडाक्षेत्रात ध्यानचंद यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारताला तीन सुवर्ण सुवर्णपदक मिळवून भारताची मान उंचावली असे प्रतिपादन   क्रीडासंचालक डॉ. भारत चापके यांनी केले.

येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. प्रभाकर सूर्यवंशी हे होते. त्यांनी हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. पुढे बोलताना डॉ. भारत चापके म्हणाले की आजच्या धावपळीच्या जीवनात युवकांनी मैदानावर व्यायाम आणि वेगवेगळ्या खेळात आपला वेळ दिला पाहिजे तरच पुढची पिढी निरोगी व दीर्घायुष्यी ठरेल. 

याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र देशमुख यांनी केले तर आभार प्रा. जगन्नाथ टोंपे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सुरेखा भोसले, अधिसभा सदस्य डॉ. विजय भोपाळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ.भीमराव मानकरे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या