🌟परभणी येथील नानलपेठ पोलिस पथकाची धाडसी कामगीरी : नाकाबंदी दरम्यान तपासणीतून चोरीच्या दहा दुचाकी जप्त..!

 


🌟ताडकळस पोलिस ठाणे हद्दीतून चोरीला गेलेल्या दोन दुचाकीचा देखील यात समावेश आहे🌟


परभणी : परभणी शहरातील नानलपेठ पोलिस पथकाने धाडसी कामगीरी बजावत जिंतूर रोडवरील विसावा फाटा येथे नाकाबंदी दरम्यानच्या तपासणीतून विविध ठिकाणांहून चोरी करुन आणलेल्या दहा मोटारसायकलीसह संशयित आरोपींना देखील ताब्यात घेण्याची धाडसी कामगीरी बजावली शहरात सर्रासपणे चोरीच्या दुचाकी मागील अनेक दिवसांपासून धावत असल्याचे निदर्शनास येत होते.

          चोरीच्या दुचाकींचा शोध घेण्यासाठी नानलपेठ पोलिस ठाण्यात पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने वाहन तपासणी करतांना चोरीची दहा वाहने जप्त केली आहेत. ताडकळस पोलिस ठाणे हद्दीतून चोरीला गेलेली दोन, बीड शहर, छत्रपती संभाजी नगरातील क्रांती चौक आणि मुकुंदवाडी, चाकण, पुणे, रिसोड, मिरज या शहरातील आणि नांदेड, व तेलंगणातील रंगारेडी आदी शहरातून चोरीस गेलेल्या मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. संशयितांना देखील ताब्यात घेण्यात आले असून संबंधित पोलिस ठाण्याला माहिती कळविण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक चितांबर कामठेवाड, सपोनि सोमनाथ शिंदे, सपोनि रविंद्र सांगळे, पोलिस कर्मचारी निलेश कांबळे, संतोष सानप, सोएब पठाण, बालाजी लिंगायत, राहुल गोला, संतोष व्यवहारे यांच्या पथकाने केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या