🌟परभणी जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन....!


🌟असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे🌟

परभणी (दि.29 आगस्ट 2023) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहामध्ये परभणी, मानवत, सेलू व पूर्णा येथे मुलाचे व मुलीचे प्रत्येकी 1 असे एकूण आठ आणि गंगाखेड येथे मागासवर्गीय मुलीचे 1 अशा एकूण 9 शासकीय वसतिगृहासाठी प्रवेश देणे सुरु आहे. तरी पात्र आणि गरजू मुला-मुलींनी शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे.

या वसतिगृहामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींना शैक्षणिक वर्ष 2023-24 व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मोफत प्रवेशाची संधी देण्यात आली आहे. तरी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीयांसह इतर प्रवर्गाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये रिक्त असणा-या जागेवर विनामूल्य प्रवेश ऑफलाईन पद्धतीने देण्यात येणार आहेत. 

गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे अर्ज संबंधित तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपालाकडून प्राप्त करून आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत. शासकीय वसतिगृहात विनामूल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जीम व इंटरनेट वाय-फाय आदी सुविधा विनामूल्य दिल्या जातात. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावरील शासकीय वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाचा (02452-220595) दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे. 

शासकीय वसतिगृहात ऑफलाईन पद्धतीने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांनी 20 सप्टेंबर 2023 पर्यत अर्ज करावेत. पहिली निवड यादी अंतिम करून ती त्याच दिवशी 26 सप्टेंबर 2023 प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीनुसार विद्यार्थ्यांना 8 ऑक्टोबर 2023 पर्यंत प्रवेश घेता येणार आहे. त्यानंतर रिक्त जागांसाठी दुस-या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार 12 ऑक्टोबर 2023 रोजी निवड यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 20 ऑक्टोबरपर्यंत पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश, त्यानंतरही जागा रिक्त राहिल्यास 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत जागेवरच प्रवेशसंधी दिली जाईल, असे श्रीमती गुठ्ठे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे....  

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या