🌟मानवत येथील जनावरांचा बाजाराची अलाऊशिंग करुन सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी....!


🌟अशी मागणी निवेदनाद्वारे मानवत नगर परिषदेकडे करण्यात आली आहे🌟

मानवत (प्रतिनिधी) - मानवत शहरात भरत असलेला जनावरांचा बाजाराची जनावरांच्या खरेदी विक्रीची अलाउंसिंग करून त्या ठिकाणी सर्वत्र परिसरात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी मानवत नगर परिषदेकडे २३ ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे. मानवत शहरातील आठवडी बाजार परिसरात दर बुधवारी जनावरांचा बाजार भरत आहे व त्यातून मोठया प्रमाणात जनावरांची खरेदी - विक्री होत आहे. परंतु काही शेतकऱ्यांना व पशुपालकांना वाटत आहे की बाजार बंद पडला त्यामुळे कमी प्रमाणात शेतकरी व व्यापारी येत आहेत तरी आठवड्याच्या रविवारी व सोमवारी या दिवशी नगर परिषदेचा वतीने आठवडी बाजार परिसरात जनावरांचा बाजार खरेदी विक्री गाय, म्हशी, बैल, शेळ्या, मेंढया व इतर जनावरांची खरेदी विक्री आठवड्याच्या बुधवारी करण्यात यावा अशी आलाऊशिंग आपल्या कार्यालया मार्फत करण्यात यावी जेणेकरून सर्व शेतकरी व्यापारी व पशुपालक यांना कळेल की दर आठवड्याला बुधवार रोजी जनावरांचा बाजार सुरळीत होत आहे यामुळे शेतकरी व्यापारी व नगर पालिकेचा ही आर्थिक लाभ होईल तसेच या परिसरात वृक्ष लागवड करण्यात यावी यामुळे जनावरांना व व्यक्तीना सावलीचा फायदा होईल अशी मागणी नगर पालिका प्रसासना कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली दिलेल्या निवेदनावर राम दहे, मुखीद अन्सारी, प्रशांत कुलकर्णी, मोतीराम राठोड, राजू कोकर, कृष्णा कोकर, अवधूत रासवे, खाजा पठाण, गोविंद फुलारी, बिरू कोकरे, विष्णू जंगले, अण्णासाहेब खरवडे, गजानन सरगर, खयुम कुरेशी, म. अकबर. म. कुरेशी, संजय कुऱ्हाडे, राजू बनगर, चाँद कादर कुरेशी, मुजीद शेख यांच्या सह पशुपालक व व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या