🌟परभणी महानगर पालिका हद्दीतील ‘घरकुलांच्या' प्रस्तावासाठी लोकनेते विजय वाकोडे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे....!


🌟घरकुल धारकांना न्याय देण्याची मागणी श्री.वाकोडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली🌟

परभणी (दि.२९ आगस्त २०२३) :  परभणी महानगर पालिका हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजना व माता रमाई घरकूल योजने अंतर्गत प्रलंबित प्रस्ताव त्वरीत मंजूर करण्याकरीता महापालिका प्रशासनास आदेश द्यावेत अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष लोकनेते विजय वाकोडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली.

परभणी महानगर पालिका हद्दीतील खाजगी, मनपा व शासकीय जमिनीवर अनाधिकृत बांधकामे, वसाहती निर्माण झाल्या आहेत. त्या जागांची नोंद मनपाच्या अभिलेखात नाही. त्यामुळे शासकीय घरकूल योजनेचा लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही. त्यामुळे सदरील जागांची गुंठेवारी नियमित नियमाकूल करण्याकरिता महापालिकेस आदेश द्यावेत व घरकुल धारकांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा वाकोडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली. घरकूल योजनेसाठी नोटरी, नमुना नंबर ८, घरपट्टी बंद केल्यामुळे अनेक लाभार्थ्यांची घरकूल बंद आहेत. नांदेड महापालिकेने जागा गुंठेवारी नियमाप्रमाणे नियमाकूल करुन घेतल्यामुळे हजारो घरकूल धारकांना लाभ मिळाला आहे. हाच नियम परभणी महापालिकेस लावावा, तरच पंतप्रधान घरकुल आवास योजनेत जवळपास १५ हजार व रमाई घरकुल योजनेत १० हजार लाभार्थ्यांना लाभ मिळू शकतो असेही वाकोडे यांनी म्हटले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या